

पीएफ खात्यातून पैसे काढण्याची किचकट प्रक्रिया आता सोपी होणार.
एटीएमद्वारे थेट पीएफ रक्कम काढता येणार.
१–२ आठवड्यांची प्रतीक्षा संपणार.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच प्रॉविडंट फंडच्या खात्यातून पैसे काढणं ही खूप किचकट प्रक्रिया असते. पैसे मिळण्यासाठी पीएफ खातेधारकांना १ ते २ आठवडे वाट पाहावी लागते. परंतु हा ही डोकेदुखी ठरणार प्रक्रिया बंद होणार आहे. सरकारनं यात सु्धारणा करत पीएफ धारकांना एटीएमची सुविधा देण्याची घोषणा केलीय. म्हणजेच आता तुम्ही पीएफचा पैसा हा एटीएम मधून काढता येणार आहे. परंतु ही सर्व्हिस कधी पासून सुरू होणार असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. त्याचे उत्तर केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीया दिलंय.
प्रॉविडंट फंडमधील रक्कम काढण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी सरकारनं नवी सुविधा आणलीय. पीएफ खात्यातील रक्कम एटीएम आणि यूपीआयद्वारे काढण्याची सुविधा मार्च 2026 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांच्या मते पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यातून 75 टक्के रक्कम काढता येत असते. येत्या काळात पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची प्रक्रिया सोपी केली जाणार आहे.
केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांनी वन इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, मार्च २०२६ अगोदर श्रम मंत्रालय अशी सुविधा आणणार आहे. त्या सुविधेद्वारे पीएफ खातेदार एटीएममधून पीएफ खात्यातील रक्कम काढू शकतात. ईपीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया यूपीआयसोबत जोडली जाईल. नव्या सुविधांचा उद्देश खातेदारांना फंडाची रक्कम जितक्या सोप्या पद्धतीनं काढता येईल तितकी सोपी बनवणं असल्याचं केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय म्हणाले.
सध्या सर्वसामान्य लोक दैनंदिन आयुष्यात पैशांच्या व्यवहारांसाठी एटीएम आणि यूपीआयचा वापर करतात. त्यामुळं ईपीएफला देखील त्याचप्रमाणे जोडण्याचं नियोजन असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिलीय. ही सुविधा लागू झाल्यानं खातेदारांना ऑनलाईन पोर्टल किंवा एम्प्लॉयरवर अवलंबून राहण्याची गरज नाहीये. क्लेम सेटल होण्यासाठी लागणारा वेळ देखील कमी होईल.
पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी वेगवेगळे फॉर्म भरावे लागतात. काही सदस्यांसाठी ही प्रक्रिया किचकट वाटत असते, क्लेम मंजूर होऊन पैसे मिळण्यास उशीर होत असतो. ईपीएफ खात्यातील रक्कम खातेदाराची असते. मात्र वेगवेगळे फॉर्म भरावे लागत असते, त्यामुळे त्यांची अडचण होत असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.