EPFO  Saam Tv
बिझनेस

कामाची बातमी! ११ वर्षांनंतर EPFO नियमांत करणार मोठा बदल; १ कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

EPFO Rule Change: ईपीएफओ कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. आता ईपीएफ सदस्य होण्यासाठी किमान वेतन वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddhi Hande

प्रत्येक कर्मचाऱ्याचे ईपीएफ खाते असते. ईपीएफओद्वारे पीएफ खाते चालवले जाते. या खात्यात दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या पगारातील ठरावीक रक्कम जमा केली जाते. दरम्याम, आता ईपीएफओच्या काही नियमात बदल होण्याची शक्यता आहे. ईपीएफ किंवा ईपीएसमध्ये सहभागी होण्यासाठी कमीत कमी १५००० रुपयांची लिमिट वाढवण्याची शक्यता आहे.याबाबत ईपीएफओच्या पुढच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, ईपीएफ आणि ईपीएस योजनेचा लाभ घेण्यासाठी पगाराची मर्यादा २५०० केली जाण्याची शक्यता आहे. जर ईपीएफओने हा निर्णय घेतला तर त्याचा कोट्यवधी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी लागणार आहे. दरम्यान, ईपीएफओ सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीची पुढची बैठक डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होणार आहे. या बैठकीत याबाबत निर्णय होईल.

आताचा नियम काय?

सध्याच्या नियमानुसार तुमचे मूळ वेतन १५००० रुपये असेल तरच तुम्ही ईपीएफ आणि ईपीएस योजनेचा लाभ घेऊ शकतात. यापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही. दरम्यान, आता हा नियम बदलला जाण्याची शक्यता आहे.

नवीन नियम काय होणार? (EPFO New Rule)

मिडिया रिपोर्टनुसार, ईपीएफ आणि ईपीएसमध्ये सहभागी होण्यासाठी वेतन मर्यादा १०,००० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.जर हा नियम बदलला तर १ कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

सध्याच्या नियमानुसार, कर्मचारी आणि नियोक्ता कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरीमधील १२-१२ टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा करतात. यातील कर्मचाऱ्याची रक्कम थेट ईपीएफ खात्यात जाते तर नियोक्त्याची ३.६७ टक्के ईपीएफ आणि ८.३३ टक्के ईपीएस खात्यात जमा केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT