EPFO Saam Tv
बिझनेस

EPFO: PF खात्यात व्याज जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला पैसे आले का? फक्त एक SMS किंवा मिस्ड कॉल देऊन करा चेक

EPFO Balance Check: ईपीएफओ खात्यावर व्याजदर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, तुमच्या खात्यात व्याजदर जमा झाले की नाही हे तुम्ही घसबसल्या चेक करु शकतात.

Siddhi Hande

ईपीएफओ अकाउंटमध्ये दर महिन्याला आपल्या पगारातील काही रक्कम जमा होते. यातील काही रक्कम ही कंपनी जमा करते. यामध्ये पैसे जमा करणे ही एक गुंतवणूकच असते. त्यामुळे या योजनेत अनेकजण गुंतवणूक करतात. या योजनेत तुम्हाला सर्वाधिक व्याजदर मिळते. यामध्ये वर्षाला व्याजदर जमा होते. या योजनेत आता व्याजदर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

पीएफ खात्यात साधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात व्याजदर जमा केले जाते. तर यावर्षी जुलै महिन्यापासूनच व्याजदर जमा केले आहेत. याबाबत मंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली आहे. २०२४-२५ साठी ३३.५६ कोटी ईपीएफ खात्यात व्याज जमा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, तुमच्या खात्यात व्याजदर जमा झाले की नाही हे तुम्ही एका एसएमएस किंवा मिस्ड कॉल देऊन जाणून घेऊ शकतात.

पीएफ खात्यावर किती व्याजदर मिळते?

सध्या ईपीएफओ खात्यात ८.२५ टक्के व्याजदर दिले जाते. दरम्यान, हे सर्वाधिक व्याजदर आहे. सरकारी योजनेत मिळणार हे सर्वात जास्त व्याजदर आहे. या योजनेत आता व्याजदर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

असा चेक करा पीएफ बॅलेंस

जर तुम्ही ईपीएफ (EPF) खातेधारक आहात. तर घसबसल्या बॅलेंस चेक करु शकतात.

सर्वात आधी https://www.epfindia.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर मेंबर पासबुकवर क्लिक करा.

यानंतर UAN नंबर आणि पासवर्ड टाका.

यानंतर संबंधिक अकाउंट सिलेक्ट करा.

यानंतर पासबुक ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला व्याज आणि बॅलेंस बघायला मिळणार आहे.

उमंग अॅपवरुन असं चेक करा

सर्वात आधी उमंग अॅप डाउनलोड करा.

यानंतर ईपीएफओ सेक्शनवर जा.

यानंतर यूएएन नंबर टाका आणि ओटीपी टाका.

त्यानंतर पासबुक बघा. त्यावर तुम्हाला तुमच्या खात्यातील बॅलेंस पाहायला मिळणार आहे.

SMS वरुन पाहू शकतात बॅलेंस

सर्वात आधी तुमचा नंबर आणि यूएएन नंबर लिंक असणे गरजेचे आहे.

यानंतर तुम्हाला 7738299899 या नंबरवर एसएमएस पाठवायचा आहे.

EPFOHO UAN MAR (MAR म्हणजे मराठी ) असा मेसेज करायचा आहे.

यानंतर तुम्हाला बॅलेंसची सर्व माहिती मिळणार आहे.

मिस्ड कॉल देऊन करा चेक

सर्वात आधी तुम्हाला 011-22901406 मिस्ड कॉल द्या.

यानंतर तुम्हाला काही सेकंदात एसएमएस येईल. त्यावर खात्यातील बॅलेंस आणि व्याजाची माहिती मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT