EPFO Pension Hike Saam Tv
बिझनेस

EPFO Pension Hike : पेन्शनधारकांना मोठं गिफ्ट मिळणार? 1,000 रुपयांची पेन्शन थेट 3,000 रुपये होण्याची शक्यता

EPFO CBT Meeting November 19 : EPFO च्या बैठकीकडे पेन्शनचा लाभ घेणाऱ्यांचे लक्ष लागलं आहे. EPS-95 अंतर्गत किमान पेन्शन १००० रुपयांवरून ३००० रुपये करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

कर्मचारी रिटायर झाल्यावर त्याला पेन्शनची म्हणजे आर्थिक आधाराची गरज असते. पण वाढती महागाई पाहता आता पेन्शनमध्ये वाढ झाली पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे असं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सांगितले. या संघटनेची (EPFO) 24 वी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) बैठक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे. या बैठकीकडे देशभरातल्या पेन्शनधारकांचं लक्ष लागलं आहे. कारण, कर्मचारी पेन्शन योजना (EPS-95) अंतर्गत मिळणारी किमान मासिक पेन्शन वाढवण्याच्या मागणीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

१००० रुपयांची पेन्शन ३००० रुपये होणार? ॉ

सध्या EPS अंतर्गत पात्र पेन्शनधारकांना महिन्याला १००० रुपये पेन्शन मिळते. ही वाढवून ३००० रुपये करण्याची चर्चा सध्या सुरू आहे. सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.

संभाव्य पेन्शन वाढीचा हिशोब:

  • सध्याची किमान पेन्शन : १००० रुपये

  • प्रस्तावित किमान पेन्शन : ३००० रुपये

  • दरमहा संभाव्य वाढ : २००० रुपये

  • वर्षभरातील संभाव्य वाढ : २४०० रुपये

मात्र, ३००० रुपयांच्या पेन्शनबाबत अजून अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे ही वाढ ठरली आहे, असं समजणं सध्या चुकीचं ठरेल.

WhatsApp वरून PF बॅलन्स तपासता येणार

EPFO ने कर्मचाऱ्यांसाठी WhatsApp च्या पीएफ संबंधित सेवा दिल्या आहेत. यासाठी तुम्हाला EPFO च्या अधिकृत WhatsApp च्या 91 8796441800 या नंबरवर फक्त 'Hi' हा मेसेज करायचा आहे. मग तुम्हाला खात्यातली शिल्लक रक्कम, मागचे पाच व्यवहारांची माहिती आणि EPF पासबुक डाउनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होतो.

एकूणच, १९ नोव्हेंबरच्या EPFO बैठकीत किमान पेन्शन वाढीबाबत काय निर्णय होतो, याकडे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत ३००० रुपये पेन्शन ही केवळ संभाव्य वाढ असल्याचे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Vegetables : कडाक्याच्या थंडीतही शरीर राहील उबदार, आवर्जून खा 'या' ५ भाज्या

Maharashtra : महाराष्ट्रातील मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Health Tips : चिंता आणि तणाव दूर करायचाय? औषधांशिवाय मन शांत ठेवण्यासाठी करा हे 7 सोपे उपाय

Maharashtra News Live Update: बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याने धुळ्यात संताप

Gold Rate Today : ग्राहकांसाठी खुशखबर! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; सुवर्णनगरीत १ तोळ्याची किंमत किती?

SCROLL FOR NEXT