EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
२०२५ मध्ये EPFO चे नियम बदलले
पीएफ क्लेम, ट्रान्सफरबाबतच्या नियमात बदल
संघटित क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असते. कर्मचारी ईपीएफओचे सदस्य असतात. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या पगारातील ठरावीक रक्कम जमा केली जाते. दरम्यान, आता २०२५ संपण्याआधी ईपीएफएओ नियमात बदल केले आहेत. यामध्ये पीएफ काढणे, ट्रान्सफर करणे ते क्लेमबाबत अनेक नियम बदलले आहेत. याचा थेट परिणाम कोट्यवधी कर्मचाऱ्यांवर होणार आहे. याचसोबत ईपीएफओ लवकरच EPFO 3.0देखील लाँच करणार आहे.
2025 मध्ये हे नियम बदलले (2025 Year Ender Rule Change)
पीएफ काढण्याचे नियम
पीएफ अॅडव्हान्स काढण्यासाठी सुरुवातीला १३ अटी होत्या. यामुळे कर्मचाऱ्यांचे क्लेम अनेकदा रिजेक्ट केले जायचे. आता फक्त ३ अटींसाठी पैसे काढू शकणार आहात. यामध्ये आजार, शिक्षण आणि लग्नासाठी पैसे काढू शकतात. याचसोबत तुम्ही पूर्ण १०० टक्के पीएफ काढू शकतात.
नोकरी बदलल्यावर आपोआप पीएफ ट्रान्सफर होणार
जर तुम्ही नोकरी बदलली तर पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी फॉर्म १३ भरावा लागायचा. यासाठी नियोक्त्याचीदेखील मंजुरी लागायची. मात्र, आता नोकरी बदलल्यानंतर आपोआप पीएफ अकाउंट ट्रान्सफर होणार आहे. कर्मचाऱ्यांची नवीन नोकरीची जॉइन डेट नियोक्ता अपडेट करणार आहे. यामुळे ट्रान्सफरमध्ये अडचण होणार नाही.
EPFO 3.0
सरकार लवकरच EPFO 3.0 लाँच करणार आहे. यामुळे ईपीएफओच्या सर्व सेवा या ऑनलाइन होणार आहे. पीएफ तुम्हाला एटीएम किंवा यूपीआयच्या माध्यमातून काढता येणार आहे. याचसोबत कोणतीही माहिती काही सेकंदात बदलता येणार आहे.
पीएफ सेटलमेंट
याआधी पीएफ सेटलमेंटमध्ये जर थोडी जरी चूक झाली तर क्लेम रिजेक्ट व्हायचा. मात्र, आता ईपीएफओने पार्ट पेमेंट सिस्टीम सुरु केली आहे. यामुळे रेकॉर्ड योग्य असेल तर लगेच पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे.
ऑटो क्लेम लिमिट १ लाखांवरुन ५ लाख
पीएफ अॅडव्हान्स ऑटो सेलटमेंटची लिमिट ५ लाख करण्यात आली आहे. यामुळे ५ लाखांपर्यंतचा पीएफ कोणत्याही मॅन्युअल पद्धतीने तपासणी होणार नाही. ७२ तासात तुमच्या क्लेमचे काम पूर्ण होणार आहे.
सदस्यांसाठी नवीन बदल
ईपीएफओने पासबुक सेवा अधिक सोपी बनवली आहे. तुम्हाला आता सिंगल लॉगिन पोर्टलवर सर्व सेवा एकाच जागेवर मिळणार आहे. याचसोबत Employees Enrolment Campaign 2025 ची सुरुवात केली. यामध्ये जे कर्मचारी ईपीएफओ सदस्य नाही त्यांना पीएफमध्ये सहभागी केले जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.