EPFO News Saam Tv
बिझनेस

EPFO: तुमची कंपनी PF खात्यात खरंच पैसे जमा करते का? EPFO ने घेतला मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांचे टेन्शन दूर होणार

EPFO New Rule: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता जर तुमची कंपनी पीएफ खात्यात पैसे जमा करत नसेल तर ईपीएफओ चौकशी करणार आहे. अशा कंपन्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

ईपीएफओ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

पीएफ खात्यात पैसे जमा करत नसलेल्या कंपन्यांची होणार चौकशी

चौकशीनंतर कारवाई केली जाण्याची शक्यता

ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या खात्यात दर महिन्याला पीएफचे पैसे जमा केले जातात. कंपनीद्वारे हे पैसे जमा केले जातात. पीएफचे पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट केले जातात. यामध्ये नियोक्त्याकडूनही काही पैसे जमा केले जातात. दरम्यान, आता ज्या कंपन्या ईपीएफओ खात्यात पीएफचे पैसे जमा करत नाही त्यांची चौकशी केली जाणार आहे.कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुरुग्राम जिल्ह्यातील ३० पेक्षा जास्त कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा पीएफ ईपीएफओ खात्यात जमा न केल्याची माहिती समोर आली आहे. नवीन नियमांनुसार, ईपीएफओ याबाबत चौकशी करु शकत नाही. परंतु आता ईपीएफओने अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. या परवानगीनंतर या कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे. गुरुग्राममध्ये १३ हजार व्यवसाय रजिस्टर आहेत. शेकडो व्यवसाय हे कोणत्याही रजिस्ट्रेशनशिवाय सुरु आहेत. या कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांचे पीएफ खात्यात पैसे जमा केले जात नाही.

ज्या कर्मचाऱ्यांचे पीएफ जमा होत नाही, त्यांच्याकडून ईपीएफओमध्ये तक्रार करण्यात आल्या आहेत. यामध्ये डिफॉल्ट कंपन्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. या कंपन्यांची पाहणी करण्यासाठी ईपीएफओने सेंट्रल अॅनालिसिस इंटेलिजेंस यूनिटकडून परवागी मागतली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर चौकशी केली जाईल. त्यानंतर कारवाई केली जाईल.

अशी करणार कारवाई

कर्मचारी भविष्य निधी म्हणजे पीएफ जमा न केल्यावर कारवाई केली जाऊ शकते. नियमानुसार, नियोक्त्यांना दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पीएफ जमा करायचे असतात.जर कंपन्यांनी असं केलं नाही तर ईपीएफओ दरवर्षी १२ टक्के व्याजदराची वसूली करु शकतात. याचसाठी नियोक्त्याला नोटीसदेखील पाठवली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vatana Batata Rassa Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी झणझणीत वटाणा-बटाटा रस्सा भाजी! पाहा ही सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: कणकवलीमध्ये भाजपचा दुसरा उमेदवार बिनविरोध

घरात टाकली धाड; 61 किलो चांदी अन् नोटांचा डोंगर पाहून पोलीस आयुक्तांचे डोळे झाले पांढरे

Motorola Signature: प्रत्येक फोटो होईल तुमची Signature; जबरदस्त कॅमेऱ्यासह Motorola Signature लॉन्च, वाचा संपूर्ण माहिती

Pune Accident : क्षणात होत्याचं नव्हतं झालं! पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT