EPFO ने मिस्ड कॉलवर पीएफ बॅलन्स आणि शेवटच्या ट्रॅनजेक्शनची माहिती देणारी नवी सेवा सुरू केली.
सदस्यांनी 9966044425 या क्रमांकावर नोंदणीकृत मोबाईलवरून मिस्ड कॉल द्यायचा आहे.
ही सेवा मोफत असून UAN सक्रिय असणं बंधनकारक आहे.
उमंग अॅप किंवा EPFO पोर्टलद्वारे देखील UAN सक्रिय करून सेवा वापरता येईल.
EPFO धारक सदस्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता तुमच्या PF खात्यातील बॅलेन्स एका मिसकॉलवर समजणार आहे. शिवाय तुमच्या खात्यातील शेवटचं ट्रॅनजेक्शन किती आहे हे देखील समजणार. पूर्वी या प्रक्रियेसाठी अनेक पायऱ्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र आता एका मिस कॉलवर तुम्हाला समजणार आहे.
शेवटचं ट्रॅनजेक्शन आणि खात्यातील बॅलेन्स चेक करण्यासाठी EPFO ने नवीन सेवा कार्यरत केली आहे. यामुळे कोट्यावधी EPFO कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. खात्यातील बॅलेन्स चेक करण्यासाठी EPFO UAN पोर्टलवर नोंदणीकृत सदस्य त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 9966044425 वर मिस्ड कॉल देऊन त्यांच्या EPFO तपशील तपासू शकतात.
जर कर्मचाऱ्याचा UAN बँक खाते क्रमांक, आधार आणि पॅन यापैकी कोणत्याही एका क्रमांकाशी जोडलेला असेल, तर सदस्याला शेवटच्या ट्रॅनजेक्शन आणि पीएफ बॅलन्सची माहिती मिळेल.
सर्वप्रथम, मोबाईल नंबर युनिफाइड पोर्टलवर UAN सह सक्रिय केलेला असणे आवश्यक आहे.
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरूनच मिस्ड कॉल द्या.
दोन रिंग वाजल्यानंतर, कॉल कट होईल. तथापि, तुम्हाला आवश्यक असलेली माहिती मिळेल.
विशेष म्हणजे, ही सेवा मिळविण्यासाठी सदस्याला कोणताही खर्च आकारला जाणार नाही.
दरम्यान, जर तुमचा UAN सक्रिय नसेल, तर ही सेवा काम करणार नाही.
ईपीएफओ वेबसाइटला भेट द्या आणि सदस्य इंटरफेसवर जा: https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/
तुमचा UAN आणि पासवर्ड एंटर करा.
आता तुम्ही ही वेबसाईट सहज वापरू शकता आणि तुमचा आधार, पॅन आणि बँक खात्याचा तपशील लिंक करून तुमचे केवायसी पूर्ण करू शकता.
पर्यायीरित्या, सबस्क्राइबर्स उमंग अॅपवर त्यांचे UAN सक्रिय करू शकतात.
या अॅपवर, तुम्हाला EPFO >> UAN सक्रियकरण >> तुमचे तपशील प्रविष्ट करा >> OTP पाठवा >> आता तुमची खरी ओळख पटेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.