EPFO News Saam Tv
बिझनेस

EPFO Latest Update: EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता 'या' महिन्यापासून PF तुमच्या UPI अकाउंटमध्ये जमा होणार, पण कसा? वाचा..

PF Withdrawal: EPFO कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. एप्रिल 2026 पासून PF पैसे थेट UPI अकाउंटमध्ये जमा होणार असून काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना आता पीएफचे पैसे काढताना येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. कारण पुर्वी नोकरी बदलताना किंवा पीएफचे पैसे काढताना बरेच दिवस वाट पाहायला लागची.

मात्र आता यामध्ये तुम्हाला UPI च्या मदतीने तुम्हाला पैसे काढता येणार आहेत. ही मोठी अपडेच काहीच दिवसांपुर्वी देण्यात आली होती. यामध्ये आणखी एक महत्वाची बाब म्हणजे कधीपासून तुम्हाला याचा लाभ घेता येईल? याची तारिख समोर आली आहे. पुढील बातमीत आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

EPFOचे सदस्य लवकरच त्यांच्या UPI अकाउंटमधून त्यांची जमा रक्कम काढू शकणार आहेत. याची सुरुवात एप्रिल २०२६ मध्ये होणार आहे. असं मनी कंट्रोल अधिकृत वेबसाइटवर एका वरिष्ठ PTI अधिकार्याने सांगितले आहे. यामध्ये कामगार मंत्रालया अंतर्गत EPFचा काही भाग युपीआय द्वारे मिळणार नाही. तर काही मिळू शकेल. कर्मचारी आपल्या बॅंक खात्यातून लिंक UPI पिनचा वापर करुन पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करु शकणार आहेत. जेव्हा हे पैसे तुमच्या खात्यात येतील तेव्हा तुम्हाला डिजीटल पेमेंटच्या मदतीने काढता येणार आहेत.

सध्या लोक भाजी घेण्यापासून ते घर घेण्यापर्यंत UPI पेमेंटचा वापर करतात. त्यामुळे ही सुविधा कर्मचाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑफलाइन फॉर्मची आवश्यकता लागत नाहीत.

जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत पाच वर्षे सेवा पूर्ण केली आणि त्याने त्याचा पीएफ काढला, तर तो किंवी ती व्यक्ती आयकर भरण्यास जबाबदार नसते. पाच वर्षांचा कालावधी एक किंवा अधिक कंपन्यांसह एकत्रित केला जाऊ शकतो. एकाच कंपनीत पाच वर्ष पूर्ण करणं आवश्यक नाही. एकूण तुमचा कार्यकाळ किमान पाच वर्षे असणे गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजितदादांच्या आठवणीने जय पवारांचे डोळे पाणावले; पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ

Political News : ऐन निवडणुकीच्या काळात बड्या नेत्यानं सोडली भाजपची साथ; तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

कल्याणमध्ये लाचखोरीचा प्रकार उघड; महापालिकेतील दोन महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई

Mumbai : केअर टेकरचं अमानवी कृत्य, २ कुत्र्यांवर अत्याचार; मुंबईतील धक्कदायक प्रकार

Maharashtra News Live Update: आशा भोसले यांचे पार्थिव घरी दाखल, अंत्यदर्शनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT