EPFO KYC Yandex
बिझनेस

EPFO KYC: घरबसल्या करता येणार EPFO ​​मध्ये E-KYC अपडेट, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

EPFO KYC Update: सर्व पीएफ खातेधारकांनी ईपीएफओमध्ये केवायसी अपडेट करणं आवश्यक आहेआज आपण घरबसवल्या EPFO ​​मध्ये KYC अपडेट करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ या.

Rohini Gudaghe

EPFO KYC Update Process

तुमचं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) म्हणजे ईपीएफओमध्ये अकाउंट आहे का? तुम्हीपण EPFO ​​मध्ये गुंतवणूक करता का? तर तुम्ही देखील पीएफ खातेधारक असाल तर आजची माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. सर्व पीएफ खातेधारकांनी ईपीएफओमध्ये केवायसी अपडेट करणं आवश्यक आहे. आज आपण घरबसवल्या EPFO ​​मध्ये KYC अपडेट करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ या.  (Latest Marathi News)

ईपीएफ खात्यात केवायसी अपडेट करण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही EPFO ​​खात्याशी संबंधित अनेक ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊ शकणार नाही. पीएफ खात्यातून पैसे काढणं कठीण होऊ (EPFO KYC Update) शकतं. तुमचे पीएफ खाते दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकणार नाही. याशिवाय ई-नामांकन फाईलचे कामही केवायसी अपडेटशिवाय करता येणार नाही. केवायसी अपडेट केल्यास ही सर्व कामे सहजपणे करता येतील. त्यामुळे केवायसी अपडेट करणं गरजेचं आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • पॅन कार्ड

  • आधार कार्ड

  • पासपोर्ट नंबर

  • मतदार ओळखपत्र (EPFO KYC Update Process)

  • बँक खाते तपशील

  • ड्रायव्हिंग लायसन

  • रेशन कार्ड

केवायसी अपडेट करण्याचा सोपा मार्ग

  • EPFO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • सर्व्हिस टॅबच्या पर्यायावर क्लिक करा.

  • यानंतर "कर्मचारी विभाग" वर क्लिक करा.

  • UAN सदस्य पोर्टलवर क्लिक करा. तेथे तुमचा UAN क्रमांक टाका.

  • तिथे पासवर्ड टाका. होम पेजवर मॅनेज पर्याय निवडा.

  • त्यानंतर KYC चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

  • आता एक नवीन पेज समोर येईल. त्यामध्ये कागदपत्रांचा पर्याय दिसेल.

  • कागदपत्रांचे तपशील तेथे टाका. सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.

  • सेव्ह बटणावर क्लिक करा.

  • त्यानंतर EPFO मध्ये KYC अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : अब्दुल सत्तारांचे प्रस्ताव फेटाळले; भूखंड देण्याबाबत औद्योगिक विकास महामंडळाला दिला होता प्रस्ताव

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

Voter ID जवळ नाही, टेन्शन सोडा, तरीही मतदान करता येणार, ही १२ कागदपत्रेही आहेत ग्राह्य

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

SCROLL FOR NEXT