EPFO Saam Tv
बिझनेस

EPFO: कामाची बातमी! आता EPFOची सर्व माहिती मिळणार डिजीलॉकरवर, कसं? वाचा सविस्तर

EPFO All Information on Digilocker: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्हाला ईपीएफओची सर्व माहिती डिजिलॉकरवर मिळणार आहे.

Siddhi Hande

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPFOच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ईपीएफओ कर्मचाऱ्यांना सर्व माहिती एकाच अॅपवर उपलब्ध होणार आहे. तुम्हाला डिजीलॉकरवर सर्व माहिती मिळणार आहे. त्यामुळे आता कर्मचारी त्यांचा पीएफ बॅलेन्स, व्याज आणि पासबुक सर्वकाही एकाच क्लिकवर पाहू शकणार आहेत. त्यामुळे कोट्यवधि कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

ईपीओफओ कर्मचाऱ्यांना UAN नंबर, पेन्शन आणि स्कीम सर्टिफिकेट याबाबत सर्व माहिती मिळणार आहे. हे सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरुपात असणार आहेत.

UMANG अॅपवर मिळते सेवा

पीएफबाबत सर्व माहिती सध्या फक्त

UMANG अॅपवर मिळणार आहे. त्यानंतर आता ही सुविधा तुम्हाला DigiLocker अॅपवरदेखील मिळणार आहे.

UAN अॅक्टिव्हेशनसाठी नवीन सुविधा

ईपीएफओने १८ जुलैपासून नवीन अपडेट केले आहे. आता तुम्ही उमंग अॅपद्वारे UAN (Universal Account Number) चे व्हेरिफिकेशन करु शकणार आहेत. ही प्रोसेस खूप सोपी आणि सुरक्षित असणार आहे.

ELI साठी UAN नंबर गरजेचे

UAN नंबर हा फक्त ईपीएफओ नाही तर Employment Linked Incentive (ELI) या योजनांचा लाभ घेण्यासाठीही अनिवार्य आहे. त्यामुळे तुम्हाला ईपीएफओच्या सर्व गोष्टींसाठी यूएएन नंबरची आवश्यकता असते.हा नंबर तुम्हाला उमंग अॅपवरदेखील मिळणार आहे.

डिजिलॉकरवर EPFO ची माहिती कशी मिळणार?

डिजिलॉकवर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे मिळतात. दहावीच्या मार्कशीटपासून ते आधार कार्डपर्यंत सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे. यानंतर आता डिजिलॉकवर तु्म्हाला EPFO ची सर्व माहिती मिळणार आहे. फक्त तुम्हाला कदाचित तुमचा UAN नंबर टाकायचा असेल. त्यानंतर सर्व माहिती उपलब्ध होईल. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबाबत माहिती समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Harshad Chopda: 'गर्लफ्रेंडने बेस्ट फ्रेंडसोबत मला चीट...'; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Maharashtra News Live Update: शेतकरी उपाशी आहेत, विकास करणाऱ्यांचा विमानाने प्रवास - उद्धव ठाकरे

पार्लरमध्ये जाण्याची गरज कशाला? 'या' ५ सोप्या स्टेप्सने घरीच करा फेशियल; चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो!

Pune : माय-लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार; पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Raigad Fort: गुड न्यूज! आता फक्त ५० रुपयांत जा किल्ले रायगडावर, महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT