EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFO EDLI Scheme: तुमचं PF अकाउंट आहे? तुम्हाला मिळतो ७ लाखांचा मोफत विमा; कसं? वाचा सविस्तर

EPFO EDLI Scheme life Insurance: ईपीएफओ खातेधारकांना ७ लाखांचा मोफत विमा दिला जातो. ईपीएफओ खातेधारकांसाठी खास एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम योजना राबवली जात आहे.

Siddhi Hande

EPFO कर्मचाऱ्यांसाठी खास योजना

कर्मचाऱ्यांना मिळतो ७ लाखांचा मोफत विमा

EDLI स्कीम नक्की आहे तरी काय?

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असते. पीएफ खात्यात दर महिन्याला एक ठरावीक रक्कम जमा केली जाते. कर्मचारी आणि नियोक्ता दर महिन्याला पैसे जमा करतात. दरम्यान, पीएफ खातेधारकांना मोफत जीवन विमादेखील मिळतो.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत जे गुंतवणूक करतात त्यांना ७ लाखांपर्यंत मोफत जीवन विमा मिळतो. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आर्थिक मदत मिळते. या योजनेचं नाव इम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स आहे. या योजनेसाठी तुमच्या पगारातून एकही रुपया कापला जात नाही. हा विमा पूर्णत कंपनीकडून सतो.

EDLI स्कीम काय आहे? (What is EDLI Scheme)

EDLI म्हणजे एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स. या योजनेत ईपीएफओअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला विमा पॉलिसीचा लाभ घेता येतो.EPF आणि EPS सोबतच विमा पॉलिसी हादेखील खूप मोठा फायदा आहे. याचाच अर्थ असा की, पीएफ खाते हे योजनेत लिंक्ड असते. जर ईपीएफ सदस्य असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेसाठी तुम्हाला पगारातून एकही रुपया भरावा लागणार नाही.नियमानुसार, नियोक्ता तुमच्या वेतनातील (बेसिक आणि महागाई भत्त्यातील) ०.५ टक्के रक्कम EDLI योजनेत जमा केली जाते. परंतु यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कोणतीही रक्कम कापली जात नाही. ही सुविधा तुमच्यासाठी मोफत असते. यामुळे संघटित क्षेत्रात कर्मचाऱ्यांना फायदा होणाक आहे.

कधी मिळणार ७ लाखांचा विमा?

विमा कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना मिळतो. जर कोणताही कर्मचारी नोकरी करत असेल अन् त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेत कमीत कमी २.५ लाख अन् जास्तीत जास्त ७ लाख रुपये मिळतात. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या कामाच्या मागील १२ महिन्यांच्या पगारावर आणि पीएफ खात्यात जमा होत असणाऱ्या रक्कमेवर ठरवली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

SCROLL FOR NEXT