EPFO कर्मचाऱ्यांसाठी खास योजना
एम्प्लॉय डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम
सेवा काळात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यावर मिळणार ७ लाख
संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे ईपीएफओ अकाउंट असते. ईपीएफमधील गुंतवणूक ही खूप फायद्याची असते. तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळते. दरम्यान, ईपीएफ कर्मचाऱ्यांना मोफत लाइफ इन्श्युरन्स कव्हरदेखील मिळते. हा इन्श्युरन्स EDLI म्हणजे एम्प्लॉयज डिपॉझिट लिंक्ड इंश्योरेंस स्कीम अंतर्गत हा कव्हर मिळतो. जर एखाद्या व्यक्तीचा नोकरी करताना मृत्यू झाला तर तुम्हाला ७ लाख रुपये मिळणार आहे.
EDLI स्कीम काय आहे? (Employee Deposit Linked Insurance Scheme)
EDLI योजनेत जर कर्मचाऱ्याचे सर्व्हिसमध्ये असताना मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला २.५ ते ७ लाख रुपयांचा इन्श्युरन्स मिळतो. कर्मचारी आणि नियोक्ता जे पैसे जमा करतात. त्यातील ०.५ टक्के रक्कम दर महिन्याला या योजनेत जमा केली जाते.
कोणाला मिळतो फायदा?
ही योजना ईपीएफ अकाउंट असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. जे सदस्य EPF मध्ये पैसे जमा करतात ते EDLI स्कीममध्ये गुंतवणूक करतात. दरम्यान, ही योजना स्थायी आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होत नाही.
फायदे काय? (EDLI Scheme Benefits)
EDLI योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांची नोकरी आणि मृत्यूचा कालावधी यानुसार आर्थिक मदत दिली दाते. नॉमिनी व्यक्तीला इन्श्युरन्सची रक्कम २० दिवसांच्या आत दिली जाते.यामुळे कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक अडचण येत नाही.
योजनेचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा?
इन्श्युरन्सची अमाउंट ही शेवटच्या १२ महिन्याच्या पीएफ बॅलेन्सच्या आधारे ठरवली जाते. यामध्ये तुमच्या सरासरी मासिक पगाराच्या ३५ पट (जास्तीत जास्त १५ हजारापर्यंत)+ पीएफच्या ५० टक्के रक्कम आधारे मोजला जातो. त्यामुळे जर या योजनेचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर दर महिन्याला पैसे जमा करावेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.