EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFOचा पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय! सुरु केली नवी सर्व्हिस; काय फायदा होणार?

EPFO Digital Life Certificate: ईपीएफओने पेन्शनधारकांसाठी नवीन सर्व्हिस सुरु केली आहे. आता तुम्हाला घरबसल्या जीवन प्रमाणपत्र मिळणार आहे. यासाठी इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेसोबत पार्टनरशिप केली आहे.

Siddhi Hande

EPFO चा मोठा निर्णय

पेन्शनधारकांसाठी सुरु केली नवी सव्हिस

आता घरबसल्या मिळणार डिजिटल जीवन प्रमाणपत्र

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने पेन्शनधारकांसाठी नवीन सर्व्हिस सुरु केली आहे. आता पेन्शधारकांना त्यांचे जीवन लाइफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी बँक किंवा ईपीएफओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या डिजिटल लाइफ सर्टिफिकेट जमा करु शकतात.

आता ईपीएफओने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसोबत पार्टनरशिप केली आहेत. आता पेन्शनधारक घरबसल्या डिजिटल प्रमाणपत्र मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज भासणार नाही.

जीवन प्रमाणपत्र काय आहे (Digital Life Certificate)?

जीवन प्रमाणपत्र हे एक सर्टिफिकेट आहे. हे सर्टिफिकेट पेन्शनधारकांसाठी असणार आहे. यामध्ये एक युनिक नंबर दिला जातो. हे सर्टिफिकेट तुम्हाला पेन्शन देणाऱ्या संस्थेत जमा करावे लागते. ज्यामुळे तुमची पेन्शन सुरु राहते. जर तुम्ही हे प्रमाणपत्र जमा केले नाही तर पेन्शन मिळणार नाही.

कसं मिळणार डिजिटल जीवन प्रमाणपत्र?

इंडिया पोस्ट पेमेंट्सच्या सर्व शाखांमधून ही सुविधा मिळणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे कर्मचारी घराघरात जाऊन डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करणार आहे. यामध्ये तुम्हाला फेस आणि फिंगरप्रिंट बायोमेट्रिक आवश्यक आहे. हे सर्व घरबसल्या करता येणार आहे. ही सर्व्हिस ईपीएफओद्वारे मोफत मिळणार आहे.

कधीपर्यंत जमा करावे लागणार जीवन प्रमाणपत्र?

पेन्शनधारकांना दरवर्षी हे प्रमाणपत्र जमा करावे लागते. जेणेकरुन त्यांची पेन्शन सुरु राहील. दरम्यान, यावर्षी १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागणार आहे. ८० वर्षांवरील नागरिक १ ऑक्टोबरपासूनच प्रमाणपत्र जमा करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Doctor Case: सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई, PSI गोपाल बदने पोलिस खात्यातून बडतर्फ

Haldi Rituals: लग्नाच्या आधी हळदीचा विधी का करावा, जाणून घ्या कारण

मानलं राव! शेतकऱ्यांच्या लेकींच्या मदतीसाठी दिग्दर्शक प्रवीण तरडे सरसावले; शिक्षणासाठी 11 लाखांची मदत

लग्नानंतर स्तनांचा आकार खरोखर वाढतो? नेमकं कारण काय? तज्ज्ञांनी दिली खरी माहिती

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची बैठक

SCROLL FOR NEXT