EPFO New Rule Saam Tv
बिझनेस

EPFOचा मोठा निर्णय! पेन्शनच्या ५ नियमांत केले बदल; थेट खिशावर होणार परिणाम

EPFO 5 Pension Rule Change: ईपीएफओने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने पेन्शनच्या ५ महत्त्वाच्या नियमात बदल केले आहेत. यामध्ये लिमिटपासून ते किमान पेन्शनमध्ये बदल केले आहेत.

Siddhi Hande

EPFO ने पेन्शनचे नियम बदलले

पेन्शनचे ५ नियम बदलले

पेन्शन लिमिटपासून ते किमान रक्कमेत बदल

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा केले जातात. दरम्यान, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शनमध्ये ५ महत्त्वाचे बदल केले आहेत. यामुळे थेट तुमच्या पेन्शनवर परिणाम होणार आहे.

1. पेन्शन सरासरी वेतनावर आधारित

याआधी पेन्शन तुमच्या शेवटच्या पगारावर आधारित येत होती. आता तुमच्या ५ वर्षातील सरासरी पगारावर आधारित पेन्शन दिली जाईल. हा नियम १ सप्टेंबर २०१४ पासून लागू आहे. आता ईपीएफओने हे काम आणखी सोपे केले आहे.

2. पेन्शनची लिमिट

याआधी किमान पेन्शन ७,५०० रुपये निश्चित होती. आता ईपीएफओने ही लिमिट वाढवली आहे. आता पेन्शनची लिमिट १५००० रुपये करण्यात आली आहे. यामुळे पेन्शनधारकांना दिलासा मिळाला आहे.

3. आता ५० वर्षानंतर मिळणार पेन्शन

याआधी पेन्शनची वयोमर्यादा ५८ वर्षे होती. आता ही पेन्शनची लिमिट कमी करण्यात आली आहे. आता तुम्हाला ५० वर्षापासून पेन्शन मिळणार आहे. तुम्ही ५० वर्षानंतर पेन्शन घेऊ शकतात.

4. आता ऑनलाइन पेन्शन क्लेम

ईपीएफओने डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु केले आहे. यामुळे आता पेन्शन क्लेम ऑनलाइन करता येणार आहे. ईपीएफओची सर्व कामे सोपी होणार आहे. फॉर्म भरणे, कागदपत्रे पडताळणी अशी सर्व कामे तुम्हाला ऑनलाइन करता येणार आहे.

5. नोकरी बदलल्यानंतर पेन्शनमध्ये होणार नाही नुकसान

ईपीएफओने पेन्शनची सुविधा अधिक सोपी केली आहे. आता जर कोणत्याही कर्मचाऱ्याने नोकरी बदलली तरीही त्याच्या पेन्शनमध्ये काही बदल होणार आहे. जुन्या नोकरीचे रेकॉर्ड नवीन कंपनीत जोडले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT