EPFO Saam Tv
बिझनेस

EPFO 3.0 Update : आता बॅंकेत जायची गरज नाही, UPI द्वारे काढा PF; एकावेळी किती पैसे काढता येणार?

PF Withdrawal: EPFO 3.0 मुळे PF काढणे आता अधिक सोपे झाले आहे. ATM, UPI आणि ऑटो क्लेम सुविधेमुळे कर्मचारी काही मिनिटांत पैसे मिळवू शकतील, लांब रांगा टाळता येतील.

Sakshi Sunil Jadhav

कामाला प्रत्येक व्यक्तीचे PFचे खाते असते. तुमच्या पगारातली काही रक्कम ही यामध्ये ठेवली जाते. जी तुम्हाला गरजेच्या वेळी कामी येते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ती रक्कम काढता. पण ही रक्कम काढण्यासाठी पुर्वी सरकारी कार्यालयाजवळ लांबच्या लांब रांगा लावायला लागायच्या. कधीकधी अर्जाची वाट पाहावी लागायची यासगळ्यात अनेक दिवस जायचे. पण आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) त्यांच्यात बदलत्या युगाप्रमाणे डिजिटल प्रणालीचा वापर केला आहे. त्यामध्ये डिजिटल प्रणाली 'EPFO 3.0' अंतर्गत कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातून थेट ATM आणि UPI मधून काढता येतो.

विशेष म्हणजे, ५ लाख रुपयांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली काढला जाणार आहे. २०२६ च्या मध्यापर्यंत ही सुविधा देशभरात पूर्णपणे लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजपर्यंत पीएफची रक्कम काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना बँक किंवा सरकारी कार्यालयात जाऊन लांबच लांब रांगा लावाव्या लागत होत्या. अर्ज प्रक्रिया आणि मंजुरीसाठी अनेक दिवस वाट पाहावी लागायची. मात्र आता डिजिटल तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. ‘EPFO 3.0’ अंतर्गत ऑटो-क्लेम सेटलमेंटची सुविधा सुरू करण्यात येणार आहे, ज्यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय संगणकीय प्रणालीद्वारे दावे जलद निकाली निघतील. तसेच, पीएफची रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

या नव्या सुविधेमुळे कर्मचारी आता त्यांच्या UPI ॲपच्या मदतीने पीएफ बॅलन्स देखील सहज तपासू शकतील. याशिवाय, EPFO आपल्या सदस्यांसाठी विशेष ATM कार्ड जारी करण्याच्या तयारीत आहे. हे कार्ड थेट पीएफ खात्याशी लिंक असेल, ज्यामुळे गरजेच्या वेळी कर्मचारी एटीएममधून थेट पैसे काढू शकतील. त्यामुळे आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीतही कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. सदस्याचा UAN (Universal Account Number) सक्रिय असणे गरजेचे आहे. तसेच, UAN हा आधार, पॅन, बँक खाते आणि IFSC कोडशी लिंक असणे अनिवार्य आहे. मोबाईल नंबरही सक्रिय असावा, जेणेकरून OTP आधारित सेवा सहज वापरता येतील.

पीएफ प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी EPFO ने देशातील प्रमुख बँकांसोबत भागीदारी केली आहे. यामध्ये State Bank of India, HDFC Bank, ICICI Bank, Axis Bank, Punjab National Bank आणि Bank of Baroda यांसह एकूण ३२ सार्वजनिक आणि खाजगी बँकांचा समावेश आहे. यामुळे नियोक्त्यांना पीएफचे योगदान जमा करणे आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे क्लेम मिळवणे अधिक सोपे होणार आहे.

Plain Saree Designs: ऑफिसमध्ये सुंदर दिसण्यासाठी नेसा 'या' 5 रंगाच्या प्लेन साड्या

पुणे हादरले! मुलाची हत्या केली अन् बॅगमध्ये भरलं; दगड बांधून विहिरीत फेकलं, तिसऱ्या लग्नासाठी आई झाली कैदासीण

Heart oxygen deficiency: धाप लागतेय, थकवा जाणवतोय? हृदयाला रक्तपुरवठा न होणाऱ्या ४ लक्षणांकडे इग्नोर करू नका

Tumbbadchi Manjula: तुंबाडची मंजुळा नक्की कोण? मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशीची कोकणातली हॉरर स्टोरी

Ghavan Recipe: कोकणी स्टाईल मऊ-लुसलुशीत घावणे कसं बनवायचं? सोपी ट्रिक वापरा

SCROLL FOR NEXT