

डायबेटीजची सुरुवातीची लक्षणे
रक्तातील साखर वाढल्यामुळे किडनीवर ताण येतो
डायबेटीज टाळण्यासाठी उपाय
सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे अनेकांना आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. विशेषत: महिलांना घरच्या जबाबदाऱ्या, कामाच्या जबाबदाऱ्या, मुलांची काळजी या सगळ्या गोष्टींकडे एकाच वेळी लक्ष द्यावं लागतं. यासगळ्यात त्यांचे २४ तास कसे संपतात हे कळतच नाही. मग चाळीशीतच त्यांना अनेक समस्यांना सामोरं लागतं. तरुणपणी कितीही उत्साही असलेला व्यक्ती कामामुळे थकत असतोच. त्यात जर स्वत:च्या खाण्यापिण्याकडे, झोपेकडे दुर्लक्ष केलं तर सुरुवातीला नाही पण भविष्यात नक्कीच त्यांना काही गंभीर समस्यांना सामारं जावं लागू शकतं.
तज्ज्ञांच्या मते, काही आजार हे तुमच्या तरुणपणीच्या चुकांमुळेच वाढत जात असतात. मग त्यांना भविष्यात एकदाच त्याचा सामना करावा लागतो. त्यातला एक आजार म्हणजे मधुमेह (Diabetes)आहे. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणं अनेकदा दुर्लक्षित केली जातात. त्यामुळे अनेकांना आजाराची जाणीव होईपर्यंत रक्तातील साखरेची पातळी वाढते.
डॉ. राकेश मेनन, एंडोक्रायनोलॉजिस्ट यांनी लेखात दिलेल्या माहितीनुसार, डायबेटीजची सुरुवातीची लक्षणं वेळेत ओळखणं गरजेचं आहे. योग्य वेळी लाइफस्टाइलमध्ये बदल आणि वैद्यकीय उपचार केल्याने हा आजार टाळता येऊ शकतो. पुढे डायबेटीजची सुरुवातीची लक्षणं दिली आहेत.
सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं लक्षण म्हणजे, सतत लघवीला होणे. कारण साखर वाढते तेव्हा किडनीला जास्त काम करावं लागतं आणि आपण पाणी जास्त पित असतो. दुसरं लक्षण म्हणजे, वजन अचानक कमी होणे. कारण या स्थितीत शरीर तुमचा फॅट आपोआप कमी करत असतं. थकत असतं. तिसरं लक्षण म्हणजे, धुसर दिसणे. कारण जेव्हा रक्ताची पातळी वाढते तेव्हा लेन्समध्ये सूज येते. त्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसत नाही.
याउलट काही व्यक्तींना जास्त भूक सुद्धा लागू शकते. हातापायांना बधिरपणा, सुन्नपणा जाणवू शकतो. त्यामुळे शरीरात होणाऱ्या छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, रोजच्या रोज व्यायाम आणि वेळेवर तपासणी करा.
टीप: ही माहिती सामान्य स्वरूपाची असून वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणतीही लक्षणे जाणवल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.