EPFO Saam Tv
बिझनेस

EPFO 3.0 कधी होणार लाँच? ATM मधून काढता येणार पीएफ, ८ कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

EPFO 3.0 Launch Date: ईपीएफओ लवकरच EPFO 3.0 लाँच करणार आहे. यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे, यामुळे तुम्ही एटीएमद्वारे पीएफ काढू शकणार आहात.

Siddhi Hande

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंट ईपीएफओद्वारे चालवले जाते. दरम्यान, ईपीएफओ लवकरच EPFO 3.0 लाँच करणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. त्यांना लहान कामांसाठी सतत बँकेत जावे लागणार नाहीये. तुमची सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. सध्या पीएफ काढण्यासाठी बँकेत जावे लागते. त्यानंतर आता या नवीन सिस्टीममध्ये तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने पीएफ काढता येणार आहे.

EPFO 3.0 काय आहे ?

कर्मचारी भविष्य निधी (EPF)चा डिजिटल सिस्टीम असणार आहे. यामुळे पीएफ काढण्यासाठी आणि सर्व सुविधा ऑनलाइन होणार आहे.

EPFO 3.0 कधी लाँच होणार ?

EPFO 3.0 जून २०२५ मध्ये लाँच होणार होत. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ही सुविधा लाँच होण्यासाठी उशिर झाला आहे.

या नवीन सिस्टीममध्ये काय मिळणार?

या नवीन सिस्टीममुळे पीएफ खातेधारक एटीएममधून पैसे काढू शकणार आहेत. आतापर्यंत तुम्हाला ऑनलाइन क्लेम करावा लागत होता.

पैसे काढण्याची प्रोसेस

पीएफ अकाउंटमधून तुम्ही यूपीआय किंवा एटीएमद्वारे पैसे काढू शकणार आहे. तुम्हाला पिन किंवा आधार नंबरद्वारे व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे.

या नवीन सिस्टीमचा फायदा काय होणार?

यामुळे तुम्हाला पीएफ काढण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने बँकेत जावे लागणार नाही. तुम्ही कुठेही आणि कधीही ऑनलाइन पद्धतीने पैसे काढू शकणार आहात.

क्लेम प्रोसेसमध्ये काय बदल होणार?

या नवीन ईपीएफओ ३.० मुळे तुम्हाला पीएफ क्लेम आणि वैयक्तिक माहितीमध्ये चुक झाली असेल तर ती सुधारण्यासाठी ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला ऑनलाइन एक सुविधा दिली जाईल.यामुळे सर्व प्रोसेस डिजिटल होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT