EPFO 3.0: 1 IN 5 PF WITHDRAWAL CLAIMS REJECTED DUE TO KYC ERRORS, CHECK IMPORTANT DETAILS Saam Tv
बिझनेस

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

EPFO 3.0 Update News : EPFO 3.0 मुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया वेगवान झाली असली तरी KYC मधील चुका, आधार-पॅन माहितीतील वेगळेपणा, एकापेक्षा अधिक UAN आणि बँक खाते पडताळणीतील त्रुटींमुळे लाखो क्लेम रिजेक्ट होत आहेत.

Alisha Khedekar

  • EPFO 3.0 मुळे PF काढण्याची प्रक्रिया अधिक वेगवान

  • 2024 मध्ये सुमारे 174 लाख PF क्लेम विविध कारणांमुळे रिजेक्ट

  • आधार, पॅन, जन्मतारीख, बँक खाते आणि UAN हे क्लेम रिजेक्शनचे प्रमुख कारण

  • PF सदस्यांनी KYC माहिती वेळेवर अपडेट करून ठेवणे अत्यावश्यक आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही रिटायरमेंटनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेची सर्वात विश्वासू बचत योजना मानली जाते. या सेवेचा लाभ देशातील ८ कोटी कर्मचारी घेत आहेत. या ८ कोटी खातेधारकांसाठी महत्त्वाची माहिती. EPFO ३.० नुसार आता पीएफ काढणं जलद झालं आहे. असं वाटत असलं तरी पैसे काढण्यासाठी केलेल्या प्रक्रियेत ५ पैकी १ क्लेम रद्द होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ २०२४ या आर्थिक वर्षात EPFO कडे सुमारे ७९६ लाख खातेधारकांनी पैसे काढण्यासाठी क्लेम करण्यात आले. यापैकी जवळपास १७४ लाख खातेधारकांचे क्लेम विविध कारणांमुळे नाकारण्यात आले. मात्र याची कारणे काय? जाणून घ्या

'या' कारणांमुळे PFचे पैसे काढण्यात अडथळे

हे क्लेम रिजेक्ट करण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आधार, पॅन आणि EPFO रेकॉर्डमधील नावातील फरक, जन्मतारीख जुळत नसणे, बँक खाते व्हेरिफिकेशन किंवा एकापेक्षा अधिक UAN असणे यामुळे अनेक खातेदारकांचे क्लेम रिजेक्ट केल्याची माहिती EPFO ने दिली. तसेच जुनी कंपनी सोडल्यानंतर नवीन कंपनी जॉईन करताना त्याची माहिती अपडेट न केल्यासही क्लेम प्रक्रियेत अडथळे येतात.

PFचे पैसे काढण्यापूर्वी काय कराल?

त्यामुळे EPF सदस्यांनी PFचे पैसे काढण्यापूर्वी आपली KYC माहिती तपासून दुरुस्त करणे आवश्यक आहे. एकच UAN, आधार-पॅनमधील वैयक्तिक माहिती, योग्य बँक खाते आणि मोबाईल क्रमांक यांची खात्री केल्यास भविष्यातील जलद डिजिटल सुविधांचा लाभ सहज घेता येईल. EPFO 3.0 मुळे प्रक्रिया वेगवान होईल, मात्र अचूक माहिती आणि योग्य कागदपत्रे यांचे महत्त्व कायम राहणार आहे.

UPI द्वारे PF कधी काढता येणार?

दरम्यान, UPI द्वारे पीएफ रक्कम काढण्याची सुविधा सुरू होणार असल्याच्या चर्चांनाही वेग आला आहे. मात्र, सध्या अशी कोणतीही सुविधा लागू करण्यात आलेली नाही. EPFO कडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच UPI किंवा एटीएमद्वारे पीएफ व्यवहारांसाठी स्वतंत्र पैसे काढण्याची मर्यादाही निश्चित करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT