EPF Vs EPS Saam Tv
बिझनेस

EPF Vs EPS: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी पेन्शन योजनेतील फरक काय? कोणत्या योजनेत किती फायदा जाणून घ्या

Employee Provident Fund Vs Employee Pension Scheme: संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी पेन्शन योजनेत काही पैसे जमा करावे लागतात. या दोन्ही योजनांमधील फरक जाणून घ्या.

Siddhi Hande

Difference Between EPF and EPS: संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळते. त्यासाठी कर्मचारी आणि कंपनी ईपीएफ खात्यात काही ठरावीक रक्कम दर महिन्याला जमा करत असते. सध्या एपीएफ म्हणजे कर्मचारी निर्वाह निधी आणि ईपीएस म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना खूप लोकप्रिय आहे. जवळपास सर्वच कर्मचारी आणि कंपन्या यामध्ये गुंतवणूक करतात. चला तर मग जाणून घेऊया या दोन्ही योजनांमधील फरक

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employee Provident Fund) योजना म्हणजे काय?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना ही कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहे. या योजनेत कर्मचारी आणि कंपनी काही ठरावीक रक्कम दर महिन्याला जमा करतात. ही गुंतवणूक कर्मचाऱ्याने किती वर्ष कंपनीत काम केले आहे त्यावर अवलंबून असतात. या फंडमध्ये गुंतवणूक केलेले पैसे तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर पेन्शन म्हणून मिळतात.

कर्मचारी पेन्शन स्कीम(Employee Pension Scheme) म्हणजे काय?

कर्मचारी पेन्शन योजनेत फक्त नियोक्ता काही ठरावीक रक्कम जमा करतात. ही रक्कम फार कमी असते. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यादृष्टीने ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत जमा करण्यात आलेले पैसे एकरकमी दिले जातात.

EPF आणि EPS मधील फरक?

  • EPF मध्ये कर्मचारी आणि नियोक्ता दोन्ही काही ठरावीक रक्कम जमा करतात तर EPS मध्ये फक्त नियोक्ता म्हणजेच कंपनी काही ठरावीक रक्कम जमा करतात.

  • EPF मध्ये कर्मचाऱ्यांचा १२ टक्के पगार जमा केला जातो. तर त्यातील ३.६७ पगार हा कंपनी जमा करते. तर EPS मध्ये फक्त कंपनी पैसे जमा करते. पगाराच्या ८.३३ टक्के रक्कम या योजनेत जमा केली जाते.

  • EPF मधील पैसे कर्मचारी कधीही काढू शकतात. तर EPS मधील रक्कम कर्मचारी सेवानिवृत्ती म्हणजे ५८ वयानंतर किंवा कंपनीत १० वर्ष पूर्ण झाल्यानंतरच काढू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

नाशिक, अमरावतीनंतर यवतमाळमध्येही लव्ह जिहाद? 'यवतमाळमध्ये 34 अल्पवयीन मुली बेपत्ता'

SCROLL FOR NEXT