Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: इंजिनियरिंग केलं, एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; पुण्याच्या अर्चित डोंगरेची यशोगाथा

Success Story of UPSC Topper Archit Dongre: पुण्याचा अर्चित डोंगरे हा यूपीएससी परीक्षेत देशातून तिसरा आला आहे. त्याने इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते.

Siddhi Hande

यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला आहे. यूपीएससी परीक्षेत पुण्याच्या अर्चित डोंगरेने देशात तिसरी रँक प्राप्त केली आहे. अर्चितने खूप मेहनतीने हे यश मिळवलं आहे. अर्चित डोंगरेला यूपीएससी परीक्षा क्रॅक करुन आयएएस व्हायचे होतेच. यासाठी अर्चितने दिवसरात्र मेहनत केली. प्रयत्नांची पराकाष्टा करत त्यांनी यश मिळवलं आहे. त्यांच्या या मेहनतीला यश मिळालं आहे.

अर्चित डोंगरेने दुसऱ्यांदा यूपीएससी (UPSC Exam) परीक्षा क्रॅक केली आहे. २०२३ मध्ये पहिल्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली होती. परंतु त्यांना १५३ रँक मिळाली होती.परंतु त्याला अजून चांगली रँक मिळवून आयएएस व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांना यशदेखील मिळाले.

अर्चित यांनी वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (VIT),वेल्लोरमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समधून बी.टेक पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेत फिलॉसॉफी हा विषय निवडला होता.

अर्चित डोंगरे हा मूळचा पुण्याचा रहिवासी. त्याने आपले शालेय शिक्षण आणि ज्युनिअर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी एका आयटी कंपनीत १ वर्ष कामदेखील केले आहे.

यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांनी कोचिंग सेंटर, स्टजी ग्रुप आणि ग्रंथालयाचा वापर केला आहे. त्यांनी ग्रंथालयात जाऊन खूप अभ्यास केला. त्यांनी पहिल्या प्रयत्नातही यश मिळवले होते. परंतु अजून चांगली रँक मिळवण्यासाठी दुसऱ्यांदा अटेम्पट दिला.

पुण्याचा अर्चित डोंगरे (Archit Dongre) हा देशातून तिसरा आणि महाराष्ट्रातून पहिला आला आहे. त्याचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. अर्चित डोंगरेने एक वर्ष नोकरी केली. नोकरी केल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. यूपीएससी परीक्षेचा त्यांनी दिवसरात्र अभ्यास केला. दिवसरात्र अभ्यास केला. जुन्या चुकांमधून तो खूप काही शिकला. त्यानंतर पुन्हा परीक्षा दिली. या परीक्षेत त्यला यश मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष

Parbhani: हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, ५ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Masoor Bhaat Recipe: लहान मुलांना डब्ब्यात द्या पौष्टिक आणि चविष्ट मसूर भात, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट,डोंबिवलीत मनसे आक्रमक, तरुणावर कारवाई

चंद्रपूर गुदमरलं! साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT