High-voltage transmission lines symbolizing power sector reforms aimed at reducing electricity costs across India. saam tv
बिझनेस

Electricity Prices: देशभरात वीज होणार स्वस्त; पावर ट्रेडिंग शुल्काबाबत केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचा मोठा निर्णय

Electricity Prices Drop : केंद्रीय वीज नियामक आयोग वीज व्यापार शुल्क कमी करून दर कमी करण्याचा विचारात आहे. लवकरच संपूर्ण भारतात वीज स्वस्त होऊ शकते.

Bharat Jadhav

  • देशभरातील वीज ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता

  • CERC कडून पावर ट्रेडिंग शुल्क कमी करण्याचा विचार

  • विजेचे दर कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचा निर्णय

देशभरातील वीज ग्राहकांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भविष्यात विजेच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय विद्युत नियामक आयोग पावर ट्रेडिंग एक्सचेंजवर लागणाऱ्या ट्रॉझेक्शन शुल्क कमी करण्याच्या विचारात आहे. CERC च्या निर्णयाचा उद्देश विजेचा दर कमी करणे हा आहे. या सुधारणांमुळे कार्यक्षमता वाढविण्यास, तरलतेची स्थिती मजबूत करण्यास आणि वेगवेगळ्या एक्सचेंजेसमध्ये किंमती तर्कसंगत करण्यास मदत होणार आहे.

जानेवारी २०२६ मध्ये टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

केंद्रीय वीज नियामक आयोगाच्या या निर्णयामुळे वीज खरेदीदारांसाठी एकूण खर्च कमी होऊ शकतो. दोन वर्षांहून अधिक काळ विचारविनिमय केल्यानंतर या वर्षी जुलैमध्ये CERC ने बाजार एकत्रीकरणाला मान्यता दिलीय. जानेवारी २०२६ पासून टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जाईल. बाजार एकात्मता म्हणजे वेगवेगळ्या एक्सचेंजेसमध्ये वीज खरेदी आणि विक्री एकाच प्रणालीमध्ये एकत्रित करणे, जेणेकरून एकच किंमत निश्चित होण्यास मदत होईल.

केंद्रीय वीज नियामक आयोग अनेक पैलूंची तपासणी करत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, डिसेंबर २०२५ मध्ये पॉवर एक्सचेंजेसकडून आकारल्या जाणाऱ्या व्यवहार शुल्काचा आढावा घेण्यासाठी सीईआरसीने एक सल्लामसलत पत्र तयार केलं आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय वीज नियामक आयोग सध्याची व्यवहार शुल्क रचना, जी प्रति युनिट दोन पैसे मर्यादित आहे, ती त्या बाजारपेठेसाठी योग्य आहे जेथे जिथे व्यापाराचे प्रमाण वेगाने वाढले आहे. सध्या ज्या पर्यायांचा विचार केला जातोय, त्यातील ट्रेडिंग सेगमेंटसाठी प्रतियुनिट १.५ पैशाच्या पिक्स्ड ट्रांझेक्शन शुल्क आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नॅपकीन फिरवत मंत्री भरत गोगावले यांनी विरोधकांना डिवचले

Crime: भाजप नेत्याकडून बायकोची हत्या, अनैतिक संबंधाचा संशय; किचनमध्येच चाकूने सपासप वार

Hair Care: केस नॅचरली हेल्दी आणि शायनी हवेत? मग सुट्टीच्या दिवशी 'हा' घरी बनवलेला हेअर मास्क नक्की लावा

Maharashtra Politics: मराठी महापौरच झाला पाहिजे, परप्रांतीय महापौर केला तर उग्र आंदोलन; कुणी दिला इशारा?

Wednesday Horoscope: राजकारण्यांसाठी उत्तम दिवस, काहींना महत्वाच्या कामात अडथळे, ४ राशींची चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT