आता E-KYC Ration Card प्रक्रिया सक्तीची करण्यात आली आहे. जर तुम्ही अजूनही रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल, तर लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला मोफत धान्य योजनेचा लाभ मिळणार नाही. महाराष्ट्र राशन कार्ड राज्य सरकारद्वारे दिले जाणारे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. हे पात्र नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळतात. ते ओळख आणि निवासस्थानाचा वैध पुरावा म्हणून रेशन कार्डचा उपयोग होत असतो.
जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही घरात बसून कार्डचं केवायसी करू शकतात.
सरकारची सार्वजनिक वितरण प्रणाली ही गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी आहे. पण काही ठिकाणी बनावट कागदपत्र वापरून लाभ घेतला जातो. याला आळा घालण्यासाठी आणि योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी Aadhaar आधारित E-KYC सक्तीची करण्यात आलीय. यामुळे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक होते आणि बनावट युनिट्स काढून टाकले जातात.
सरकारने ई-केवायसीसाठी 30 जून 2025 ही अंतिम मुदत ठरवली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. जर रेशन कार्डचं केवायसी केलं नाही तर तुमचे रेशन कार्ड रद्द केले जाईल. कार्ड रद्द झाल्यानंतर मोफत धान्य मिळणार नाही. भविष्यात इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. तुम्हाला बनावट युनिट समजून सिस्टीममधून हटवले जाईल.
MERA E-KYC App आणि Aadhaar Face RD App Google Play Store वरून डाउनलोड करा.
लोकेशन निवडा आणि तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.
स्क्रीनवर दिलेला कॅप्चा टाका. नंतर OTPने पडताळणी करा.
माहिती पडताळा आणि फेस ई-केवायसीचा पर्याय निवडा.
मोबाईलचा कॅमेरा ऑन करून फोटो काढा आणि सबमिट करा.
राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या वेबसाइटला भेट द्या.
“E-KYC Ration Card” पर्याय निवडा.
आधार आणि रेशन कार्डचा तपशील टाका.
OTP टाकून पडताळणी करून घ्या.
रेशनकार्ड संदर्भात काही समस्या असतील तर स्थानिक रेशन कार्यालय, CSC किंवा जनसेवा केंद्र, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात जाऊन समस्येचं समाधान करा. ई-केवायसीची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे. यानंतर कोणतीही संधी मिळणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.