EDLI scheme Saam Tv
बिझनेस

EDLI scheme: EDLI योजनेच्या कालावधीत तीन वर्षांची वाढ, असा घेता येणार लाभ

EDLI scheme Important Information: एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स म्हणजेच EDLI योजनेचा कालावधी संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स म्हणजेच EDLI योजनेचा कालावधी तीन वर्षांनी वाढवला आहे. EPFO च्या सुमारे 6 कोटी सदस्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. EDLI योजनेअंतर्गत, EPFO सदस्यांना 7 लाख रुपयांपर्यंतचा मोफत जीवन विमा मिळतो. यापूर्वी 28 एप्रिल 2021 रोजी EDLI योजनेसाठी अधिकृत अधिसूचना जारी करून, EPFO सदस्यांच्या वारसांना उपलब्ध विमा लाभ तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला होता.

EPFO ने 7 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचे लाभ घेण्यासाठी नियम (Rule) शिथिल केले आहेत. EDLI योजना 1976 मध्ये सुरू झाली. ज्याचा उद्देश कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना विम्याचा लाभ मिळवून देणे हा आहे. जेणेकरून जेव्हा जेव्हा EPFO सदस्याचा मृत्यू होतो तेव्हा कुटुंबाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. विम्याची रक्कम ईपीएफ खातेधारकाच्या नॉमिनीला म्हणजेच वारसदाराला दिली जाते. जर कोणाला नॉमिनी केले गेले नसेल, तर त्याच्या कायदेशीर वारसांना विम्याची रक्कम(Sum insured) मिळते.

विम्याची रक्कम पगारावर अवलंबून असते

एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला 20 टक्के बोनससह मागील 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 30 पट मिळते. कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा जमा होणाऱ्या पीएफच्या रकमेपैकी 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये, 3.67 टक्के ईपीएफमध्ये आणि 0.5 टक्के रक्कम ईडीएलआय योजनेत जमा केली जाते.

तुम्ही तुमची नोकरी सोडल्यास तुम्हाला लाभ मिळणार नाहीत

EDLI योजनेअंतर्गत कोणताही खातेदार किमान रु. 2.5 लाख आणि कमाल रु. 7 लाखांचा विमा दावा मिळवू शकतो. किमान दावा मिळविण्यासाठी, खातेदाराने किमान 12 सतत महिने काम केलेले असावे. या काळात तो कार्यालयात काम करत असो वा रजेवर असो याचा विमा दाव्यावर काही फरक पडत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT