Oil Price Hike Saam Tv
बिझनेस

Oil Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! तेलाची फोडणी महागली, एका डब्यामागे ६० रुपयांची वाढ

Edible Oil Prices: सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी आहे. खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. तेलाच्या १५ किलोच्या एका डब्यामागे ६० रुपये जास्त मोजावे लागणार आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडलं आहे.

Priya More

गृहिणींचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. कारण खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. इराण आणि इस्राईलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका खाद्यतेलाच्या किंमतीवर बसला आहे. १५ लिटर तेलाच्या एका डब्यामागे आता ६० रुपये जास्त मोजावे लागणार आहे. शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, पाम तेल, मोहरीचे तेल आणि वनस्पती तूप या सर्वांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये किलोमागे ३ ते ४ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे १५ लिटरच्या एका तेलाच्या डब्यामागे तुम्हाला ५० ते ६० रुपये अधिक मोजावे लागणार आहे. आयात शुल्क कमी झाल्यामुळे खाद्यतेलाच्या किंमती काही दिवसांपूर्वी कमी झाल्या होत्या. पण इराण-इस्राईल युद्धामुळे तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या.

मोहरीचे तेल, पाम तेल आणि सूर्यफूलाच्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. कच्च्या तेलावरील आयात शुल्क १० टक्क्यांनी कमी केल्यामुळे सर्वच खाद्यतेलांच्या किंमतीत घसरण झाली होती. पण इराण-इस्राईल युद्धामुळे तेलाच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. घाऊक बाजारामध्ये शेंगदाणा तेल वगळता सर्वच खाद्य तेलाच्या किंमतीत १५ किलोच्या डब्यामागे आणि लिटरच्या डब्यामागे ५० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे.

फक्त शेंगदाणा, सूर्यफूल, मोहरीचे तेल आणि पाम तेलाच्या दरात वाढ झाली नाही तर खोबरेल तेलाच्या दरात देखील वाढ झाली आहे. गोटा खोबऱ्याचे भाव वाढल्यामुळे २५ किलो खोबरेल तेलाच्या डब्याच्या किंमती ६ हजार रुपयांवर पोहचल्या आहेत. तेलांच्या दरात वाढ झाल्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. तेलाची फोडणी महागल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवे अर्ज आणि पुन्हाe-KYC सुरू? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT