Tomato prices increased Economics Times
बिझनेस

Economic Survey 2024: देशातील बाजारात कांदा आणि टोमॅटो का महागला? अर्थमंत्र्यांनी सांगितलं कारण

Why tomato onion prices increased: केंद्र सरकारने सादर केलेल्या 2023-2024 च्या आर्थिक सर्वेक्षणात कांदा आणि टोमॅटोच्या महागाईवरही चर्चा करण्यात आलीय.

Bharat Jadhav

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सोमवारी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण 2023-2024 सादर केलं. या सर्वेक्षणात 2023-24 या आर्थिक वर्षातील आर्थिक कामगिरीचे तपशीलवार विश्लेषण करण्यात आलंय. सर्वेक्षणानुसार, देशाची अर्थव्यवस्था विस्तारत आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये वास्तविक GDP 8.2 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. या सर्वेक्षणात कांदा आणि टोमॅटोच्या महागाईवरही चर्चा झाली.

खाद्यपदार्थांच्या वाढल्या किमती

सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणात 2023-2024 खाद्यपदार्थांच्या किमती का वाढल्याची माहिती देण्यात आली. खराब हवामान, कमी पाण्याची पातळी आणि पिकांचे नुकसान यामुळे कृषी उत्पादनावर परिणाम झालाय. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यात. पिकांच्या उत्पन्नासाठी हवामान योग्य नसल्याने भाजीपाला आणि डाळींच्या उत्पादनात परिणाम झालाय. रिपोर्टनुसार, ग्राहक अन्न किंमत निर्देशांक (CFPI) वर आधारित अन्न महागाई 3.8 टक्क्यांनी वाढलीय.

आर्थिक वर्ष 2012 मधील 6.6 टक्क्यांवरून आर्थिक वर्ष 2013 मध्ये 6.6 टक्के आणि आर्थिक वर्ष 2014 मध्ये 7.5 टक्क्यांपर्यंत वाढली होती. गेल्या दोन वर्षांत अन्नधान्याची चलनवाढ ही जागतिक पातळीवरील घटना आहे. हवामानातील बदल, भयंकर उष्णता, असामान्य पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट, मुसळधार पाऊस आणि दुष्काळ हीदेखील महागाईची प्रमुख कारणे असल्याचे सरकारने म्हटलंय.

कांदा आणि टोमॅटोचे भाव वाढण्याची कारणे

आर्थिक सर्वेक्षणानुसार, जुलै 2023 मध्ये हवामान बदल आणि विविध पीक रोगामुळे यात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भावामुळे कृषी उत्पादनावर परिणाम झाला. तसेच देशाच्या उत्तर भागात मान्सून पावसाचे लवकर आगमन आणि विविध भागात उत्पादनात व्यत्यय आल्याने टोमॅटोचे भाव वाढलेत. तर गेल्या पीक हंगामात झालेल्या पावसामुळे रब्बी कांद्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. खरीप कांद्याच्या पेरणीला विलंब, खरिपातील लागवडीला उशीर यासह अनेक कारणांमुळे कांद्याचे भाव वाढल्याची माहिती केंद्र सरकारने दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

SCROLL FOR NEXT