Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana ekyc : पती, वडीलांचे e-KYC बंधनकारक; लाडकींची संख्या आणखी घटणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

ladki bahin yojana ekyc update : बातमी लाडकी बहीणीसंदर्भात... राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केलाय. त्यामुळे या योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यताय. काय आहेत हे नियम पाहूया एक खास रिपोर्ट...

Girish Nikam

छाननी केल्यानंतर आता सरकारनं आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. महिला लाभार्थीच्या पती किंवा वडिलांची ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलंय. अडीच लाख वार्षिक उत्पन्न, चार चाकी वाहनं, एकाच घरात दोन पेक्षा जास्त लाभार्थी अशा पातळीवर प्रत्येक जिल्ह्यात छाननी झाली. आता त्यापुढे जाऊन पती किंवा वडिलांच्याही वार्षिक उत्पन्नाचीही पडताळणी होणार आहे. महिलेचं लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचा उत्पन्न बघितलं जाईल.हे e-KYC कसं करायचं ते पाहूया..

e-KYC कसं कराल?

www.ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाईटवर जा

e-KYC बॅनरवरील फॉर्मवर क्लिक करा

आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर आलेला

OTP टाकून Submit बटण क्लिक करा

लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली की नाही हे तपासणार

e-KYC पूर्ण नसल्यास आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासणार

पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक, कॅपचा नमूद करून ओटीपीसाठी क्लिक करा

OTP मोबाईलवर मिळाल्यावर तो टाकून सबमिट म्हणावं.

छाननीनंतर 14 हजार पुरुष आणि आठ हजार सरकारी कर्मचा-यांनीही घुसखोरी करत सरकारी पैशांवर डल्ला मारल्याचं उघड झालंय.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सुरु करण्यात आली. निकषांकडे दूर्लक्ष करत काटेकोर छाननी न करताच सरसकट लाभ देण्यात आलाय हे वास्तव आहे.

आता एक वर्षानंतर योजनेचा आर्थिक भार पेलवत नसल्यानं सरकारने अर्जांची पडताळणी आणि आता ई-केवायसीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाडकींची संख्या आपसूकच आणखी कमी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

SCROLL FOR NEXT