e Aadhaar App Saam Tv
बिझनेस

e Aadhaar App: आता घरबसल्या काही मिनिटांत करता येणार आधार अपडेट; नाव, पत्ता सर्वकाही बदलता येणार

e Aadhaar App Launch: सरकारने ई आधार अॅप लाँच केले आहे. या अॅपवरुन तुम्ही अवघ्या काही मिनिटांत तुमची माहिती अपडेट करु शकतात.

Siddhi Hande

ई आधार अॅप लाँच

काही मिनिटांत आधार कार्ड करता येणार अपडेट

नवीन अॅपचे फीचर्स वाचा

आधार कार्डसंबंधित सर्व कामे आता डिजिटल पद्धतीने होणार आहे.यासाठी भारत सरकारने एक नवीन अॅप लाँच केले आहे. केंद्र सरकारने ई आधार अॅप लाँच केले आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरुन सर्व कमे अवघ्या काही मिनिटांत करु शकणार आहेत. याचसोबत नागरिकांना काही आधार कार्डमधील माहितीत काही बदल करायचे असतील तर तेदेखील ऑनलाइन होऊ शकतात. यासाठी तुम्हाला आधार केंद्रात जाण्यात गरज नाही.

ई आधार अॅपमध्ये काय असणार खास? (e Aadhaar App Features)

ई आधार अॅपवर तुम्हाला डिजिटल पद्धतीने आधार कार्ड मिळणार आहे. तुम्ही हे आधार कार्ड क्यूआर कोडच्या माध्यमातून शेअर करु शकतात. तुम्ही जी माहिती शेअर करायची आहे तेवढीच तुम्ही शेअर करु शकतात. यामुळे तुमची माहिती ही खूप सुरक्षित असणार आहे. तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने कोणतीही कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही.

तुम्ही घरबसल्या फोनवरुन आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख आणि पत्ता अपडेट करु शकतात. तुम्हाला याबाबत फक्त काही माहिती द्यायची आहे त्यानंतर तुमच्या माहितीत बदल केले जाणार आहे.

ई आधार अॅप हे युजर फ्रेंडली असणार आहे. त्यामुळे अॅप वापरणे खूप सोपे असणार आहे. यावर तुम्हाला फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन यासारखे बायोमेट्रिक अपडेटदेखील मिळणार आहे.

नवीन ई आधार अॅप तुम्ही प्ले स्टोअरमधून डाउनलोड करु शकतात. अँड्रॉइड आणि अॅपल या दोन्ही डिव्हाइसवर हे अॅप उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला बायोमेट्रिक माहिती लॉक अनलॉक करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र ATS ची पुण्यात छापेमारी

Pune : मुंब्र्यानंतर पुण्यात छापेमारी, कोंढव्यात एकजण ताब्यात, दहशतवादी जुबेर हंगरगेकरसोबत कनेक्शन

Gavran Style Paneer Chilli Recipe: आजीच्या हातची गावरान स्टाईल पनीर चिली, आता फक्त १० मिनिटांत बनवा, सोपी रेसिपी

स्मशानात जातो, करणी करतो, चुटकी वाजवतो अन् भूतबाधा काढतो; कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर; धक्कादायक VIDEO व्हायरल

Shocking : धक्कादायक! भर लग्नमंडपात नवरदेवावर हल्ला, बोहल्यावर चढणार इतक्यात...

SCROLL FOR NEXT