Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: गुड न्यूज! दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा सोनं ५५०० रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे दर

Gold- Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरामध्ये मोठी घट झाली आहे. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर किती वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

  • २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ५५० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

  • चांदीच्या दरात मात्र वाढ झाली असून प्रति किलो २००० रुपयांची वाढ झाली.

  • सोनं खरेदीसाठी आज सुवर्णसंधी आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याला सोनं खरेदी करणं शुभ मानले जाते. आज मोठ्याप्रमाणात सोनं खरेदी केलं जातं. दसऱ्याच्या दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सोन्याच्या दरात आज मोठी घट झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये आज तब्बल ५५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली पण चांदीचे दर मात्र वाढले आहेत. आज दसऱ्यानिमित्त सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी १८,२२ आणि २४ कॅरेटचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ५५० रुपयांनी कमी झाले आहेत. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,१८,६९० रुपये मोजावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५५०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,८६,९०० रुपये खर्च लागणार आहेत. आज जास्त प्रमाणात सोन्याचे बिस्टिक, नाणं खरेदी केले जाते. त्यामुळे २४ कॅरेटचं हे सोनं खरेदी करण्यासाठी चांगील संधी आहे.

सोन्याचे दागिने हे २२ कॅरेटमध्ये तयार केले जातात. त्यामुळे आज २२ कॅरेटचे दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे कारण याच्या दरात देखील मोठी घट झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज १,०८,८०० रुपये मोजावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याचे दर ५००० रुपयांनी कमी झाले आहे . हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १०,८८,००० रुपये मोजावे लागणार आहेत.

त्याचसोबत, आज १८ कॅरेट सोन्याचे दर देखील कमी झालेले आहेत. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ३८० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ८९,०२० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३८०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ८,९०,२०० रुपये मोजावे लागतील.

एकीकडे आज सोन्याचे दर जरी कमी झाले असले तरी चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज एक ग्राम चांदीच्या दरात २ रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी तुम्हाला आज १५३ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये २००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,५३,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Travel : समुद्र, किल्ला अन् हिरवागार निसर्ग; सिंधुदुर्गतील Hidden ऐतिहासिक ठिकाण

Vicky Kaushal : कतरिना कैफने दिली गुडन्यूज; विकी कौशलनं लेकासाठी खरेदी केली करोडो रुपयांची लग्जरी कार, पाहा VIDEO

Eknath Shinde : "सोन्याची अंडी देणारी कोंबडी पकडून ठेवली..." एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर तिखट टोला

Special Trains : गुड न्यूज! महाराष्ट्रातून धावणार १४ स्पेशल ट्रेन, मुंबई-पुण्यातून किती अन् कोणती ट्रेन धावणार?

Maharashtra Live News Update: सक्षम ताटे खून प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT