Apply for your learning licence online from home with a simple and hassle-free process. Canva
बिझनेस

Driving License: घरबसल्या कसं बनवायचं लर्निंग लायसन्स? कोणते कागदपत्र लागतात, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Driving License Online Application: भारतात घरबसल्या ऑनलाइन लर्निंग लायसन्ससाठी अर्ज कसा करावा हे जाणून घ्या. आवश्यक कागदपत्रे, पात्रता आणि टप्प्याटप्प्याने प्रक्रिया तपासा.

Bharat Jadhav

  • घरबसल्या ऑनलाइन लर्निंग लायसन्स अर्ज करता येतो

  • RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही

  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात

रस्त्यावर वाहन चालवताना चालकांकडे परवाना असला पाहिजे. जर तुमच्याकडे लायसन्स नसेल तर तुम्हाला भूर्दंड भरावा लागू शकतो. पण परवाना मिळवण्यासाठी आरटीओ कार्यालयाची परवानगी लागते. त्यात अनेक दिवसांचा विलंब होत असल्यानं अनेकजण लायसन्स बवण्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु आता तुम्हाला लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाहीये. तुम्ही घरबसल्या आरामात लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज कसा करावा

सर्वात आधी तुम्हाला परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइट उघडल्यानंतर 'ऑनलाइन सेवा' Online Services’ विभागात जा आणि 'ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवा' Driving License Related Services’ वर क्लिक करा.

तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल. प्रत्येक राज्याची आरटीओ प्रणाली वेगळ्या पद्धतीने कार्य करते. तुमचे राज्य निवडल्यानंतर, तुमच्यासमोर अनेक पर्याय दाखवले जातील, त्यामधून तुम्ही 'शिकाऊ परवान्यासाठी अर्ज करा' (‘Apply for Learner Licence’) हा पर्याय निवडा.

त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे आधीपासून वाहन चालवण्याचा किंवा शिकण्याचा परवाना आहे का नाही, याची खात्री करा. मग, दुचाकी किंवा चारचाकी यासारखी तुमची श्रेणी निवडा. हा संपूर्ण टप्पा अचूकपणे भरणे महत्त्वाचे आहे, कारण पुढील प्रक्रिया त्यावर अवलंबून असते. कोणत्याही चुकांमुळे नंतर समस्या निर्माण होऊ शकतात.

फॉर्म भरण्यापासून ते चाचणी देण्यापर्यंतची प्रक्रिया

आता पुढील पायरी थोडी अधिक तपशीलवार आहे. येथे तुम्हाला आधार कार्ड किंवा आधार क्रमांक न टाकताही तु्म्ही पुढील प्रोसेस करू शकतात. जर तुमचा आधार लिंक नसेल तर तुमचा बराचसा तपशील आपोआप भरला जातो, ज्यामुळे वेळेची बचत होते. त्यानंतर तुम्हाला एक ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये तुमचा वैयक्तिक तपशील, पत्ता आणि इतर संबंधित माहितीचा समावेश असतो. फॉर्म सादर केल्यानंतर तुम्हाला ऑनलाइन शुल्क भरणे आवश्यक आहे.

पैसे भरल्यानंतर तुम्हाला वाहतुकीचे नियम आणि चिन्हे यावर आधारित एक स्लॉट बुक करावा लागेल. ऑनलाइन चाचणी द्यावी लागेल. ही चाचणी कठीण नसते, परंतु मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. तुम्ही चाचणीत उत्तीर्ण झाल्यास तुमचा शिकाऊ परवाना मंजूर होतो आणि तुम्ही तो ऑनलाइन डाउनलोड करू शकता.

कोणती कागदपत्रे लागतील?

यासाठी अनेक कागदपत्रे सादर करावी लागतील, ज्यामध्ये वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा यांचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्राची देखील आवश्यकता असू शकते. यासह तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो देखील अपलोड करावा लागेल. तुम्ही तुमचे आधार कार्ड वापरल्यास, अनेक कागदपत्रांची गरज कमी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर MIDC मध्ये 5 दिवसांचा आठवडा होण्याची शक्यता

Weight loss injection: लठ्ठपणावर मात करणं आता झालं स्वस्त, वजन घटवणारं औषध ₹900 पासून उपलब्ध

Salary Cuts: मुख्यमंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत सर्वांच्या पगारात कपात, नेमकं कारण काय?

Banana Water Use For Long Hair : लांब केसांसाठी करा केळीच्या सालीचा वापर, केस झटपट वाढतील

Kulfi Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी तयार करा टेस्टी आणि थंडगार कुल्फी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT