Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: आधी डॉक्टर झाली, कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS आकांशा आनंद यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IAS Dr Akansha Anand: आयएएस आकांशा आनंद यांना पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत अपयश मिळाले. त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

Siddhi Hande

प्रत्येकाची काही न काही स्वप्ने असतात. आपण कितीही मोठे झालो तरीही आपली स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा सर्वांनाच असते. असंच काहीसं डॉ. आकांशा आनंद यांच्यासोबत झालं. त्या आधी डॉक्टर झाला त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. त्या आज आयएएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. आकांशा आनंद यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्या वेटरनरी डॉक्टर झाल्या. त्यानंतर त्या आयएएस अधिकारी झाल्या. आकांशा आनंद या मूळच्या बिहारमधील पाटणा येथील रहिवासी. त्यांचे वडील प्रवीण कुमार हे हेल्थ डिपार्टमेंटमध्ये क्लर्क पदी कार्यरत आहेत. तर आई या शिक्षिका आहेत.

आकांशा यांनी मेडिकल क्षेत्रात करिअर करायचे ठरवले होते. त्यांनी पटना येथील वेटरनरी कॉलेजमधून गोल्ड मेडल मिळत ग्रॅज्युएशन पूर्ण केले. वेटरनरी डॉक्टर असतानाही आकांशा यांनी आयएएस अधिकारी होण्याचे ठरवले. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. याच दरम्यान त्यांना सीतामढी येथे वेटरनरी डॉक्टर म्हणून नोकरी मिळाली होती. परंतु त्यांनी आयएएस होण्याची तयारी सुरु ठेवली.

पहिल्या प्रयत्नात अयशस्वी

यूपीएससी (UPSC) परीक्षेत अनेकांना पहिल्या प्रयत्नात अपयश येते. असंच अपयश आकांशा आनंद यांनादेखील आलं. त्यांनी प्री परीक्षादेखील पास केली नव्हती. परंतु त्यांनी आशा सोडली नाही. त्यांनी सेल्फ स्टडी आणि युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास केला. विविध संस्थांमधून स्टडी मटेरियल घेत त्यांनी अभ्यास केला.

आकांशा आनंद यांनी पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्यांना ऑल इंडिया रँक २०५ प्राप्त झाली. त्यांनी रोज ८-१० तास अभ्यास केला. त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. त्यांचा संकल्प आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं. कितीही अपयश आले तरीही आपली इच्छाशक्ती ही नेहमीच आपली मदत करते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. आकांशा आनंद आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT