Income Tax Filling News SAAM TV
बिझनेस

ITR Filling News : इन्कम टॅक्स रिटर्न भरताना ही चूक करू नका, अन्यथा १० लाखांचा दंड

Income Tax Filling News : प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची (ITR Filling) अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. या तारखेच्या आधी आयटीआर भरणे अत्यंत आवश्यक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Income Tax Filling News : प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची (ITR Filling) अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. या तारखेच्या आधी आयटीआर भरणे अत्यंत आवश्यक आहे. सध्यातरी मुदत वाढवली जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. अंतिम मुदतीच्या तारखेआधी आयटीआर फाइल केलं नाही तर मोठा दंड भरावा लागू शकतो.

अनेक जण अस नोकरीतून मिळालेल्या उत्पन्नाव्यतिरिक्त अन्य मार्गाने पैसे कमावतात. तर काही परदेशात नोकरी करत आहेत. अशावेळी आयटीआर फाइल करावा की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. महत्वाची बाब म्हणजे, सर्व प्रकारच्या उत्पन्नाची माहिती आयटीआर फाइल (ITR Filling) करताना द्यावी लागते. जर तुम्ही कोणतीही माहिती लपवली तर तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

अलीकडेच प्राप्तिकर विभागाने (Income Tax) सर्व करदात्यांना यासंदर्भात अलर्ट केलं आहे. ज्या करदात्यांचे परदेशात बँक खाते आहे किंवा उत्पन्नाचा स्रोत आहे, अशांनी आयटीआर भरताना विदेशी मालमत्तेसंदर्भात माहिती देणे आवश्यक आहे.

प्राप्तिकर विभागाने ट्विटमध्ये म्हटले की, ज्या करदात्यांचे अन्य देशांत खाते किंवा उत्पन्न स्रोत (Income Source) आहे, त्यांनी असेसमेंट इअर २०२३-२४ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना फॉरेन अॅसेट शेड्युल आवश्य भरावे. विदेशी उत्पन्न आणि मालमत्तेसंदर्भातील सर्व माहिती द्यावी.

जर संबंधित करदात्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती लपवली तर प्राप्तिकर विभागाकडून संबंधितांवर कारवाई होऊ शकते. अशा प्रकरणात करदात्यांना १० लाखांचा दंड भरावा लागू शकतो.

काय आहे नियम?

जर एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात १८२ दिवस भारतात (India) राहते तर त्यांना नागरिक मानले जाते. निवासी नागरिकाचे वैश्विक उत्पन्न करपात्र ठरते. विदेशातून वेतनस्वरुपात मिळालेल्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागते. विदेशी चलनाच्या स्वरुपात मिळालेले वेतन भारतीय चलनात कन्व्हर्ट करून कंपनीची माहिती द्यावी लागते. जर या वेतनावर कोणत्याही स्वरुपाची करकपात झाली असेल तर, ती रक्कम रिर्टनमध्ये दाखवून टॅक्स क्रेडिट क्लेम करू शकता. डबल टॅक्सेशन अवॉइडंस अॅग्रीमेंट (DTAA) चा लाभ घेऊन तुम्ही दुहेरी कर आकारणी टाळू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT