बिझनेस

Diwali Car Offer: दिवाळीत नवीन कार खरेदी करताय? 'हे' ५ आहेत बेस्ट, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

Instant Delivery Cars: या दिवाळीत ₹१० लाखांपेक्षा कमी किंमतीत नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास, रेनॉल्ट किगर, मारुती स्विफ्ट, किआ सोनेट आणि होंडा अमेझ तात्काळ उपलब्ध आहेत.

Dhanshri Shintre

दिवाळी जवळ आल्याने घरे, बाजारपेठा आणि रस्ते उजळून निघाले आहेत. या दिवसांत लोक नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानतात. मग ते घर असो, सोने असो किंवा नवीन कार असो. वाहन निर्मात्यांनीही या सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स आणि तत्काळ डिलिव्हरीचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. जर तुम्ही यंदाच्या दिवाळीत नवीन कार खरेदीचा विचार करत असाल, तर काही मॉडेल्स अशी आहेत जी बुकिंगनंतर लगेचच ग्राहकांच्या हाती येऊ शकतात.

१. रेनॉल्ट किगर

Renault Kiger ही ४ मीटरपेक्षा कमी लांबीच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक दमदार पर्याय ठरते. ही गाडी पेट्रोल इंजिन आणि दोन प्रकारच्या ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. ८ इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जर, व्हेंटिलेटेड सीट्स आणि ७ इंची डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले यांसारखी आधुनिक वैशिष्ट्ये यात मिळतात. सुरक्षिततेसाठी सहा एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि मागील पार्किंग सेन्सर्स दिले गेले आहेत. या गाडीची किंमत ₹५.७६ लाखांपासून सुरू होऊन ₹१०.३४ लाखांपर्यंत आहे.

२. मारुती स्विफ्ट

भारतीय ग्राहकांमध्ये दीर्घकाळापासून लोकप्रिय असलेली Maruti Swift आता पेट्रोल आणि सीएनजी या दोन इंधन पर्यायांसह बाजारात आहे. यात १० इंची टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग, पुश-बटण स्टार्ट आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी सोयी आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सहा एअरबॅग्ज, ईएससी आणि आयएसओफिक्स माउंट्सची सुविधा दिली आहे. मारुती स्विफ्टची किंमत ₹५.७९ लाख ते ₹८.८० लाख आहे.

३. मारुती डिझायर

त्याच इंजिन आणि वैशिष्ट्यांसह येणारी Maruti Dzire सेडान आणखी एक आकर्षक पर्याय आहे. स्विफ्टपेक्षा अधिक प्रीमियम इंटीरियर, ३६०-डिग्री कॅमेरा आणि टीपीएमएस यांसारखी अतिरिक्त वैशिष्ट्ये तिला वेगळी ओळख देतात. मोठी बूट स्पेस आणि आरामदायी राईड यामुळे ती फॅमिली कारच्या श्रेणीत आदर्श ठरते. डिझायरची किंमत ₹६.५१ लाखांपासून ₹९.३२ लाखांपर्यंत आहे.

४. किआ सोनेट

एसयूव्ही सेगमेंटमध्ये तंत्रज्ञान आणि स्टाइलचा उत्तम मेल साधणारी Kia Sonet देखील दिवाळीच्या खरेदीसाठी सज्ज आहे. ही एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल इंजिनांसह तसेच अनेक ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध आहे. ड्युअल १०.२५ इंची डिस्प्ले, व्हेंटिलेटेड सीट्स, ४-वे इलेक्ट्रिक ड्रायव्हर सीट आणि लेव्हल-१ एडीएएस यांसारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये यात दिली आहेत. किआ सोनेटची किंमत ₹७.३० लाख ते ₹१४.०९ लाख आहे.

५. होंडा अमेझ

तर Honda Amaze मध्ये १.२-लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे. यात ८ इंची टचस्क्रीन, वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि मागील एसी व्हेंट्सच्या सोयी उपलब्ध आहेत. सुरक्षिततेसाठी सहा एअरबॅग्ज, लेनवॉच कॅमेरा आणि एडीएएस तंत्रज्ञान दिले असून त्यात अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट आणि ऑटोनॉमस ब्रेकिंगचा समावेश आहे. होंडा अमेझची किंमत ₹७.४१ लाखांपासून ₹१० लाखांपर्यंत आहे.

दिवाळीच्या खरेदीसाठी ही मॉडेल्स केवळ आधुनिक सोयी आणि सुरक्षिततेच्या बाबतीतच नव्हे, तर तत्काळ डिलिव्हरीमुळेही ग्राहकांना आकर्षित करतात. त्यामुळे सणाच्या काळात नवीन कार घेण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी हा योग्य काळ ठरतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Fitness Routine: खरचं १०,००० पाऊलं चालण्याने शरीरात हे चमत्कारीक बदल होतात का?

Guru Gochar 2026: 12 वर्षांनंतर गुरु करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; या राशींना मिळणार चांगली नोकरी आणि पैसा

Green Chutney Recipe : 'सँडविच'ची चव वाढवणारी 'हिरवी चटणी' घरी कशी बनवाल? वाचा परफेक्ट रेसिपी

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

SCROLL FOR NEXT