Bank Holiday December 2026: डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच बँकेशी संबंधित महत्त्वाचं काम करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या १ डिसेंबर, मंगळवारी देशातल्या दोन शहरांमध्ये बँकांच्या शाखा बंद राहतील. त्यामुळे चेक जमा करणं, पासबुर अपडेट करणं, डिमांड ड्राफ्ट काढणं किंवा केवायसीसारखी कामं करण्यासाठी बँकेत जाण्याच्या विचार करत असाल तर आधी बँकेच्या सुट्ट्यांची माहिती जाणून घ्या.
१ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमधल्या काही शहरांमध्ये स्थानिक सण आणि विशेष दिवसांनिमित्त बँकांना सुट्टी असेल.
ईटानगर (अरुणाचल प्रदेश) - इंडिजिनस फेथ डे (Indigenous Faith Day) निमित्त बँकांच्या शाखा बंद राहतील. हा दिवस राज्यातल्या पारंपरिक आदिवासी संस्कृती आणि स्वदेशी धार्मिक परंपरांना समर्पित आहे.
कोहिमा (नागालँड) - स्टेट इनॉग्यूरेशन डे (State Inauguration Day) निमित्त बँकांना सुट्टी असेल. नागालँडच्या राज्य स्थापनेशी संबंधित हा दिवस स्थानिक पातळीवर साजरा केला जातो. ही सुट्टी केवळ संबंधित शहरांपुरची मर्यादित असून देशातल्या इतर शहरांमध्ये बँकांचं कामकाज सामान्यपणे सुरू राहील. तर महाराष्ट्रात नियमित बँका सुरू राहतील.
बँकांच्या शाखांना सुट्टी असली तरी ग्राहकांना डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येतील. UPI, IMPS, NEFT, RTGS, मोबाइल बँकिंग, नेट बँकिंग आणि ATM सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. पण चेक क्लिअरन्स, पासबुक अपडेट, डिमांड ड्राफ्ट आणि केवायसीसारख्या शाखेत जाऊन कराव्या लागणाऱ्या कामांसाठी ग्राहकांना पुढच्या कामकाजाच्या दिवसाची वाट पाहावी लागू शकते.
३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत काही ठिकाणी बँकांना सुट्ट्या असतील.
१ डिसेंबर, मंगळवार - ईटानगर आणि कोहिमा येथे बँका बंद.
३ डिसेंबर, गुरुवार - गोव्यातील पणजी येथे फीस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियरनिमित्त बँका बंद.
६ डिसेंबर, रविवार - साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील बँका बंद.
त्यामुळे बँकेत जाण्याआधी आपल्या शहरातल्या सुट्टीची माहिती तपासून घ्या ऐनवेळी बँकेत गेल्यानंतर गैरसोय होऊ नये, यासाठी महत्त्वाची आर्थिक कामं आधीच पूर्ण करण्याचं नियोजन करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.