DAUGHTER-IN-LAW PROPERTY RIGHTS: KNOW WHAT HINDU SUCCESSION LAW SAYS saam tv
बिझनेस

सासू सासऱ्यांचे घर, जमीन, मालमत्ता सुनेला मिळू शकते का? कायदा काय सांगतो, जाणून घ्या

Property Rights of a Daughter-in-Law: सासू-सासऱ्यांच्या घर, जमीन किंवा मालमत्तेत सुनेला थेट हक्क मिळतो का? हिंदू वारसा कायद्यानुसार सुनेचे वारसाहक्क, पतीच्या हिस्स्यातील अधिकार आणि घरात राहण्याचा हक्क याबाबत जाणून घ्या.

Omkar Sonawane

लग्नानंतर अनेक मुलीना एक प्रश्न नेहमीच सतवत असतो की सासू सासऱ्यांच्या नावावर असलेल्या घर, जमीन किंवा इतर प्रॉपर्टीमध्ये आपला हक्क आहे का? विशेष म्हणजे घरात वाद झाल्यानंतर हा प्रश्न नेहमी भेडसावत असतो. अनेकदा घरात राहण्याचा अधिकार आणि प्रॉपर्टीमधील मालकी हक्क या दोन्ही गोष्ट एकच असल्याचा गैरसमज होतो. मात्र या कायद्यात या दोन्ही गोष्टी भिन्ह आहेत.

हिंदू वारसा कायद्यानुसार, नवऱ्याचा मृत्यू मृत्यूपत्र न करता झाला तर त्याच्या प्रॉपर्टीवर सर्वात आधी बायको आणि त्याच्या मुलांचा हक्क असतो. यामध्ये मुलगा, मुलगी, बायको आणि आई यांचा समावेश आहे. मात्र या यादीमध्ये सून ही स्वतःच्या नात्याने थेट पहिली वारस येत नाही. याचा अर्थ असा की, सासऱ्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टीवर सुनेला फक्त सून असल्यामुळे हिस्सा मिळत नाही. मात्र परिस्थिती आणि वस्तुस्थितीनुसार तिचा नवरा त्या संपत्तीचा वारस होऊ शकतो आणि त्यानंतर नवऱ्याला मिळालेल्या प्रॉपर्टीमध्ये सुनेचे कायदेशीर हक्क निर्माण होण्याची शक्यता असते.

जर सासऱ्यांचा मुलगा म्हणजेच सुनेच्या नवऱ्याचा सासऱ्यांच्या आधी मृत्यू झाला असेल, तर परिस्थिती वेगळी असू शकते. अशा वेळी मृत मुलाच्या हिस्स्यावर त्याची विधवा बायको आणि मुलांचा वारसाहक्क लागू होऊ शकतो. हिंदू वारसा कायद्यात मृत मुलाच्या वारसांबाबत स्वतंत्र तरतुदी आहेत. त्यामुळे सुनेला सासऱ्यांच्या संपत्तीत थेट सून म्हणून नव्हे, तर तिच्या मृत पतीच्या हिस्स्यातील वारस म्हणून हक्क मिळण्याची शक्यता असते.

सासू किंवा सासऱ्यांनी स्वतःच्या पैशातून खरेदी केलेली मालमत्ता ही त्यांनी केलेल्या कष्टाची संपत्ती असू शकते. अशा संपत्तीचा मालक कायद्यानुसार ती स्वतःकडे ठेवू शकतो, विकू शकतो किंवा वैध वसीयत करून तिचे वाटप करू शकतो. त्यामुळे केवळ सून त्या घरात राहत आहे किंवा अनेक वर्षांपासून तिथे वास्तव्यास आहे, या कारणावरून घराची मालकी तिच्या नावावर आपोआप येत नाही.

सासू-सासऱ्यांच्या घरातून सुनेला थेट बाहेर काढता येते का?

सासू-सासऱ्यांच्या नावावर घर आहे, म्हणून प्रत्येक परिस्थितीत सुनेला थेट घराबाहेर काढता येईल, असे म्हणता येत नाही. दुसरीकडे, राहण्याचा अधिकार मिळाला म्हणजे त्या घरावर सुनेची मालकी निर्माण झाली, असेही नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोणजे गावात नाना पाटेकरांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार, अंत्यविधीची तयारी सुरू

lemon peel Uses : लिंबाची साल कचरा समजून फेकू नका! झाडांसाठी आणि गार्डनसाठी अशी ठरेल वरदान

Famous Actress : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे निधन, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Nana Patekar Family: लाइमलाइटपासून दूर नाना पाटेकर यांचे कुटुंब; पत्नी आणि मुलगा काय करतात?

Weight Loss : नवरात्रीत फिटनेसचा फंडा, वजन कमी करण्यासाठी रोज किती वेळ गरबा खेळावा?

SCROLL FOR NEXT