Dadar to Bhusawal Express Boost For Khandesh Connectivity saam tv
बिझनेस

खान्देशसाठी आनंदाची बातमी! विनाब्रेक धावणार दादर-भुसावळ एक्स्प्रेस; तिकीट दरातही दिलासा

Dadar to Bhusawal Express Boost For Khandesh Connectivity: पश्चिम रेल्वेने दादर-भुसावळ एक्सप्रेस नियमित धावणार आहे. यामुळे खान्देशच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Bharat Jadhav

  • दादर-भुसावळ एक्सप्रेस आता नियमित गाडी

  • विनाब्रेक धावणार, प्रवाशांना मोठा फायदा

  • तिकीट दरात दिलासा

खान्देशातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. दादर-भुसावळ एक्स्प्रेसबाबत पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. विशेष गाडी म्हणून सुरू असलेली ही सेवा आता नव्या क्रमांकासह (१९०४७/४८) नियमित गाडी म्हणून धावणार आहे. याबाबतची माहिती जळगावच्या भाजप खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवासी संख्या, मागणी आणि उपलब्ध सुविधा यांचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.

भविष्यात या गाडीच्या फेऱ्या वाढवण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. स्मिता वाघ यांनीही खान्देशवासीयांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळाल्याचे सांगत समाधान व्यक्त केले आहे. आतापर्यंत ही गाडी वेळोवेळी मुदतवाढ देत चालवली जात होती. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि सातत्यपूर्ण मागणी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासाही मिळणार आहे. ही गाडी नियमित सेवेत आल्यानंतर तिकीट दरात सुमारे २० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शकता आहे. यामुळे नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी तसेच रुग्णांसाठी प्रवास अधिक किफायतशीर आहे. ही गाडी आठवड्यातून ३ दिवस मुंबई ते भुसावळ असा प्रवास आहे. आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शनिवारी या दिवशी भुसावळ एक्सप्रेस धावणार आहे. दरम्यान या निर्णयामुळे मुंबई (दादर) ते भुसावळ दरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. खान्देशातील नागरिकांसाठी मुंबईत नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी येणं जाणं करणं अधिक सोपे होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT