DA Hike Saam tv
बिझनेस

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्याची घोषणा लवकरच; पगार कितीने वाढणार; वाचा सविस्तर

DA Hike Announcement In April: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लवकरच महागाई भत्त्याबाबत घोषणा होऊ शकते. दरम्यान, महागाई भत्ता हा ३ टक्क्यांनी वाढू शकतो.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

लवकरच होणार महागाई भत्त्याची घोषणा

पगार कितीने वाढणार?

केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची घोषणा होऊ शकते. आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची घोषणा होऊ शकते. येत्या एक-दोन आठवड्यात महागाई भत्ता वाढण्याची घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान, याबाबत अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही.

महागाई भत्ता लवकरच वाढणार (DA Hike Announcement)

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढतो. पहिल्यांदा जानेवारीमध्ये त्यानंतर जूनमध्ये अशा दोन टप्प्यांमध्ये महागाई भत्ता वाढतो. दरम्यान, अजूनही २०२६ जानेवारीच्या महागाई भत्त्याची घोषणा झालेली नाही. त्यामुळे पुढच्या काही दिवसात याबाबत घोषणा होऊ शकते. दरम्यान, घोषणा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना त्या महिन्यांचा एरियरदेखील दिला जाईल. त्यामुळे कधीही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी येऊ शकते.

मिडिया रिपोर्टनुसार, सरकार यावेळी महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा करु शकते. सध्या महागाई भत्ता ५८ टक्के आहे. त्यात ३ टक्क्यांनी वाढ केल्यानंतर महागाई भत्ता ६१ टक्के होईल. याआधी मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरुन ५८ टक्के केला होता.

पगार किती वाढणार? (Government Employees DA Hike)

महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीवर अवलंबून असतो. जर तुमची बेसिक सॅलरी ५६,१०० रुपये आहे. तर सध्याच्या महागाई भत्त्यानुसार त्यावर ३२,५३८ रुपये मिळतात. जर हा भत्ता ६१ टक्के झाला तर ३४,२२१ रुपये होईल. म्हणजेच यामध्ये १,६८३ रुपयांची वाढ होईल. याचसोबत जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचा एरियर जोडला जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यात अतिरिक्त ६,७३२ रुपये मिळू शकतात. याचसोबत ट्रान्सपोर्ट अलाउंसदेखी वाढले आणि ग्रॅच्युटीमध्येही वाढ होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे सेवा विस्कळीत

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT