Dearness Allowance 60 Percent google
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; या राज्यात महागाई भत्ता 60 टक्क्यांवर

DA Hike Update: सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांंसाठी महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २ लाखांहून जास्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.

Sakshi Sunil Jadhav

  • सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची माहिती

  • महागाई भत्त्यात वाढ झाली

  • किती वाढ मिळणार?

सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ८व्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरु होत्या. याच कामांना आता वेग आला आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA Hike) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ आसाम सरकारने आसाममध्ये केली आहे.

महागाई भत्त्यात किती टक्क्यांनी वाढ करणार?

सरकारने महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ करण्याचं मंजूर केलं आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरित ६० टक्क्यांनी वाढ केली आहे. या आधी हा दर ५८ टक्के होता.

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला गेला. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पहिल्याच बैठकीत जाहीर केला. राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ ८ लाखांहून जास्त कर्मचारी, पेन्शनधारक आणि कुटुंबातले पेन्शनधाकर घेतील. महागाई भत्त्यासोबतच महागाई सवलत (DR) मध्येही २ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्येही वाढ होईल.

बैठकीनंतर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं की, आतापर्यंत कर्मचाऱ्यांना ५८ टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता त्यात २ टक्क्यांची वाढ केली आहे. म्हणजेच आता ६० टक्के महागाई भत्ता होईल. याच निर्णयामुळे सध्याचे कर्मचारी, रिटायर झालेले कर्मचारी, पेन्शन घेणारे कर्मचारी तसेच विशेष पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांना आणि रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी दिला जातो. महागाईच्या वाढत्या दरानुसार त्यामध्ये वेळच्या वेळी बदल केले जातात. त्यामुळे आसाम सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT