DA Hike 2026 meta ai
बिझनेस

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Salary Hike : काही राज्यांमध्ये सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी DA मध्ये ८ टक्के वाढ मंजूर केली असून, वाढीव महागाई भत्त्याचा लाभ सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या वेतनातून टप्प्याटप्प्याने मिळणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पंजाबमधील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांची आता चांदी होणार आहे. पंजाब सरकारने महागाई भत्त्यात (DA) एकूण ८ टक्के वाढ केली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत जाणार आहे. ही वाढ दोन टप्प्यांत प्रत्येकी ४ टक्के अशा स्वरुपात दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीनंतर मंत्री अमन अरोरा यांनी कर्मचारी नेत्यांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत DA वाढीची माहिती दिली. या निर्णयामुळे ४ लाख सरकारी कर्मचारी आणि ३.५ लाख पेन्शनर्स यांना फायदा होणार असल्याचे वृत्त आहे. सरकारच्या तिजोरीवर सुमारे २५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या सॅलरीत वाढ

उपलब्ध माहितीनुसार DA ची पहिली ४ टक्के वाढ सप्टेंबरच्या पगारात, तर दुसरी ४ टक्के वाढ ऑक्टोबरच्या पगारात दिली जाणार आहे. सप्टेंबरचा पगार १ ऑक्टोबरला मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना वाढीव DA चा लाभ त्यावेळी दिसू शकतो.

या बैठकीत फक्त DA चाच मुद्दा नव्हता. १७ जुलै २०२० नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनमानाचा प्रश्न, प्रोबेशन काळातील वेतन, जुनी पेन्शन योजना (OPS), २०० रुपयांचा प्रोफेशनल टॅक्स, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि संगणक शिक्षकांचे प्रश्न यावरही चर्चा झाली.

मिड-डे मील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणीही कर्मचारी संघटनांनी केली. सरकारने या विविध मागण्यांवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. पुढील बैठक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, DA थकबाकीचा स्वतंत्र मुद्दा अद्याप कायम आहे. ८ टक्के वाढीचा हा निर्णय म्हणजेच आधीच्या थकबाकीचा संपूर्ण निपटारा असा अर्थ होत नाही. संबंधित न्यायालयीन आणि इतर मागण्यांवर पुढील चर्चा सुरू राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

Kidney disease symptoms: किडनी निकामी होण्यापूर्वीच सावध व्हा; 'या' 3 टेस्ट देतील जीवनदान

Fresh Flowers : पूजेची फुले लगेच वाळतात? 'ही' १ सोपी ट्रिक वापरा, आठवडाभर राहतील ताजी तवानी

CJP Protest: खरी लढाई तर आता सुरू, सीजेपी नेते आंदोलनावर ठाम; थेट पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT