Sakshi Sunil Jadhav
अधिकृत NSDL पोर्टलवर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने ओटीच्या मदतीने लॉगिन करून NCMC Card चा Available Wallet Balance पाहता येतो.
NCMC Card घेताना दिलेला मोबाईल क्रमांक टाकून ओटीच्या मदतीने लॉगिन केल्यानंतर लिंक केलेले कार्ड निवडता येते.
प्रवासादरम्यान कंडक्टरच्या ETIM मशीनवर NCMC Card तपासून कार्डमधील उपलब्ध बॅलन्स जाणून घेता येतो.
ST बस स्थानकावर उपलब्ध ETIM मशीनवर NCMC Card ठेवल्यानंतर कार्डची माहिती आणि शिल्लक रक्कम तपासता येते.
बस स्थानकातील तिकीट खिडकीवर NCMC Card देऊन त्यातील उपलब्ध बॅलन्स कर्मचाऱ्याकडून जाणून घेता येतो.
NCMC Card च्या बॅलन्ससाठी अधिकृत हेल्पलाइन क्रमांक 022-42022190 वर संपर्क करता येतो.
हेल्पलाइनवर संपर्क करताना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा NCMC Card क्रमांकाची माहिती आवश्यक असू शकते.
NCMC Card रिचार्ज केल्यानंतर उपलब्ध शिल्लक रक्कम तपासल्यास रिचार्ज योग्यरीत्या जमा झाला आहे का, हे समजण्यास मदत होते.
ST बसने प्रवास करण्यापूर्वी कार्डमध्ये पुरेशी शिल्लक आहे याची खात्री केल्यास प्रवासाच्या वेळी होणाऱ्या संभाव्य अडचणी टाळता येऊ शकतात.