Da Hike News  Saam TV
बिझनेस

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ; तुमचा पगार किती रुपयांनी वाढणार? जाणून घ्या

DA Hike for Central Government Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ २ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारने काल केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA Hike) वाढ केली आहे. महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ मंजुर केली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरुन ५५ टक्के झाला आहे. यामुळे १ कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्य पगारात वाढ होणार आहे.

केंद्र सरकारने २०१८ मध्ये ४ टक्के, त्यानंतर ३ टक्के आणि आता महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार हे जाणून घेऊया.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४ प्रकारची बेसिक सॅलरी मिळते. त्यात २४,६००, ३७,५००, ५४,३०० आणि ७१,१०० रुपयांचा समावेश आहे.या पगारातदेखील वाढ होणार आहे.

कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार फायदा (DA Hike For Central Government Employees)

बेसिक सॅलरी २४,६०० रुपये असेल तर

जर तुमची बेसिक सॅलरी २४,६०० रुपये असेल तर ५३ टक्क्यांच्या हिशोबाने १३,०३८ महागाई भत्ता मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला ३७,६३८ रुपये पगार मिळणार आहे. आता या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे तुम्हाला १३,५३० रुपये महागाई भत्ता मिळणार आहे. त्यामुळे तुमचा पगार ३८,१३० रुपये होणार आहे.

३७,५०० बेसिक सॅलरी असेल तर कॅल्क्युलेशन

सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी जर ३७,५०० रुपये पगार असेल तर ५३ टक्क्यानुसार महागाई भत्ता ५७,३७५ रुपये मिळणार आहे. तर आता ५५ टक्क्यानुसार महागाई भत्ता २०,६२५ रुपये होईल. यामुळे पगार ५८,१२५ रुपये होणार आहे.

५४,३०० रुपये बेसिक सॅलरी असेल तर

जर कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ५४,३०० रुपये असेल तर ५३ टक्क्यानुसार महागाई भत्ता २८,७७९ रुपये असेल. तर आता ५५ टक्क्यानुसार महागाई भत्ता २०,६२५ रुपये असेल. त्यामुळे तुमचा पगार ८४१६५ रुपये होणार आहे.

७१७०० बेसिक सॅलरीवर महागाई भत्ता

जर तुमची बेसिक सॅलरी ७१७०० रुपये असेल तर ५३ टक्क्यानुसार महागाई भत्ता ३८,००१ रुपये असणार आहे. आता महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ झाल्यावर महागाई भत्ता ३९,४३५ रुपये होणार आहे. तुमच्या महागाई भत्त्यात १,४३४ रुपयांनी वाढ होणार आहे. तुम्हाला १,११,१३५ रुपये पगार मिळणार आहे.

वर्षातून दोनदा होते महागाई भत्त्याची घोषणा

वर्षभरात दोनदा महागाई भत्त्याची घोषणा होते. हा महागाई भत्ता जानेवारी आणि ऑक्टोबर महिन्यापासून लागू होतो. ८ वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी ही महागाई भत्त्याची घोषणा झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होणार आहे. पुढच्या वर्षी ८वा वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारात आणखी वाढ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CIDCO Lottery 2025: '३५ लाखांचं घरं ७५ लाखाला विकतात', सीडकोबाबत RTI मधून धक्कादायक माहिती उघड

Mahesh Manjrekar: आज शिवाजी महाराज असते तर...; महेश मांजरेकरांसह 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचे कलाकार साई चरणी नतमस्तक

Surya Gochar Luck: सूर्य तूळ राशीत करणार मार्गक्रमण, मिथुन, सिंहसह आणखी एक रास होणार मालामाल

Jalgaon : धरणात पोहण्यासाठी उतरणे जीवावर बेतले; तरुणाचा बुडून मृत्यू

Silver Rate Prediction: सोन्यापेक्षा चांदीनं केलं मालामाल! १० महिन्यात ₹९०,००० वाढ, आता खरेदी करणे योग्य का?

SCROLL FOR NEXT