DA Hike Saam Tv
बिझनेस

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! होळीआधी वाढणार महागाई भत्ता; पगारात होणार इतकी वाढ

DA Hike Before Holi: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार होळीआधी महागाई भत्त्याची घोषणा करु शकते. महागाई भत्त्यात वाढ केल्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. होळीपूर्वी केंद्र सरकार महागाई भत्त्याची घोषणा करु शकते. जर होळीपूर्वी ही घोषणा झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे आणि पेन्शनधारकांनाही फायदा होणार आहे. जर महागाई भत्त्याची घोषणा झाली तर १.२ कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वर्षातून दोनदा वाढ करते. जानेवारी आणि जुलै महिन्यात ही वाढ होते. होळीपूर्वी महागाई भत्त्यात जी वाढ होईल ती जानेवारीपासूनच लागू होणार आहे. याआधीही मार्च महिन्यातच महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

५ मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत चर्चा केली होती. मागच्या वेवेळी महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली होती.दरम्यान, या वर्षीही तेवढी वाढ करण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळाने मागच्या वर्षी महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे आता किती वाढ होते याकडे सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान, यावेळी २ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. याचसोबत कर्मचाऱ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. लवकरच कर्मचाऱ्यांसाठी ८ वा वेतन आयोग लागू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola : सोन्याचे विक्रमी दर; अकोल्यात मात्र कमी भावात सोनं, काय आहे नेमकं प्रकरण वाचा

New LIC Policy: LIC ने लाँच केल्या २ जबरदस्त योजना! कमी प्रिमियमवर मिळणार भरघोस परतावा; वाचा संपूर्ण माहिती

KDMC News : आशा सेविकांची दिवाळी होणार गोड, पालिकेकडून बोनस जाहीर, खात्यात पैसे कधीपर्यंत येणार?

Diwali 2025 : नरक चतुर्दशी कोणत्या दिवशी आहे? जाणून घ्या महत्त्व

Mahalaxmi Rajyog: यंदाची दिवाळी होणार धमाकेदार, १०० वर्षांनी बनणार महालक्ष्मी राजयोग; 3 राशींना बोनससह मिळणार पैसा

SCROLL FOR NEXT