DA Hike: Saam Tv
बिझनेस

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता ५९ टक्के होणार! नवरात्रीपूर्वी सरकार करणार मोठी घोषणा

DA Hike Under 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाटी दिलासादायक बातमी समोर येत आहे. महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. नवरात्रीपूर्वी याबाबत घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

नवरात्रीपूर्वी महागाई भत्त्याची घोषणा होण्याची शक्यता

महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्क्यांनी वाढ केली जाणार

सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. पुढच्या सरकारी कर्मचाऱ्यांबाबत मोठी घोषणा होऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ (DA Hike) होऊ शकते. दरवर्षी दिवाळीआधी महागाई भत्त्यात वाढ होते. दरम्यान, यावर्षी सप्टेंबर महिन्यात नवरात्री सुरु होणार आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये कदाचित महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. हा महागाई भत्त्याची घोषणा जरी सप्टेंबरमध्ये झाली तरीही हा भत्ता १ जुलैपासून लागू होणार आहे.

किती वाढणार महागाई भत्ता? (How Much DA Hike Expected)

जुलै २०२५ मध्ये वाढणारा महागाई भत्ता हा ३ ते ४ टक्क्यांनी वाढू शकतो. म्हणजेच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ ते ५९ टक्के होऊ शकतो. दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढला जातो. जानेवारी आणि जुलै महिन्यात हा भत्ता वाढला जातो. दरम्यान, जानेवारीच्या महागाई भत्त्याची घोषणा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होते. परंतु हा महागाई भत्ता १ जानेवारीपासूनच लागू होता. तर त्यानंतर जुलै महिन्याच्या महागाई भत्त्याबाबत घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होते. परंतु हा महागाई भत्ता जुलै महिन्यापासूनच लागू झालेला असतो. त्यामुळे जेव्हा महागाई भत्त्याची घोषणा होईल तेव्हा एरियर तुमच्या पगारासोबत येणार आहे.

महागाई भत्ता कसा ठरवला जातो?

महागाई भत्ता हा ग्राहक किंमत निर्देशांक ( CPI-IW) च्या आधारावर ठरवला जातो. यासाठी कामगार मंत्रालयाकडून आकडेवारी जारी केली जाते.

महागाई भत्ता हा महागाईच्या आकडेवारीवर अवलंबून असतो. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तादेखील वाढत आहे.

महागाई भत्ता (Dearness Allowance)

यावेळी जर ग्राहक किंमत निर्देशांक ( CPI-IW) स्थिर राहिला तर सरकार महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्क्यांची वाढ करु शकते. यामुळे महागाई भत्ता ५८ ते ५९ टक्के होऊ शकतो. दरम्यान, CPI-IW ची आकडेवारी आल्यानंतर कॅबिनेटची मंजुरी मिळेल. त्यानंतरच महागाई भत्ता वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Maharashtra Live News Update : सांगली-मिरजला पावसाने झोडपले,

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT