DA Hike meta ai
बिझनेस

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पुढचे 2 महिने ठरणार गेमचेंजर, DA 63% होणार?

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील दोन महिने महत्त्वाचे आहेत. जुलै २०२६ च्या डीए वाढीचा निर्णय आणि आठव्या वेतन आयोगाच्या बैठकींमुळे पगार आणि पेन्शनबाबत मोठ्या अपडेटची अपेक्षा आहे.

Sakshi Sunil Jadhav

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची समोर आली आहे. पुढील दोन महिने आता खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. एकीकडे जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याबद्दल (DA) केंद्र सरकारच्या निर्णयाची कर्माचारी वाट पाहतायेत, तर दुसरीकडे आठव्या वेतन आयोगाच्या महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष या दोन्ही घडामोडींकडे लागलं आहे.

दसऱ्याआधी DA वाढीची घोषणा होणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या जुलै २०२६ च्या डीए वाढीबद्दल सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सर्व काही नियोजित पद्धतीने झाले तर दसऱ्यापर्यंत डीए वाढीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा २० ऑक्टोबरला दसरा आहे.

महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा बदल केला जातो. हा बदल ‘ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स’ (AICPI-IW)च्या आकडेवारीवर आधारित असतो. जानेवारी २०२६ पासून डीए २ टक्क्यांनी वाढून ६० टक्के करण्यात आला होता. आता जुलै ते डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी ३ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असं झाल्याने डीए ६३ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र अंतिम निर्णय केंद्र सरकारच घेणार आहे.

आठव्या वेतन आयोगाच्या बैठका महत्त्वाच्या

आठव्या वेतन आयोग स्थापन होऊन जवळपास १० महिने पूर्ण होत आहेत. आयोगाकडून कर्मचारी संघटना, पेन्शनधारक आणि इतर संबंधित घटकांशी चर्चा सुरू आहे. आगामी बैठका पुढीलुप्रमाणे आहेत:

9 सप्टेंबर - पुडुचेरी

16 ते 18 सप्टेंबर - चंदीगड

7 आणि 8 ऑक्टोबर - बेंगळुरू

या चर्चांनंतर आयोग आपल्या शिफारशींच्या दिशेने पुढे जाऊ शकतो. अंतिम अहवाल जानेवारीपर्यंत सादर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर अंतिम अहवाल मे-जून 2027 पर्यंत येण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेश कमिटी बरखास्त; पक्षात खळबळ

Fact Check : मोबाइल नंबर अपडेट केला नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

SCROLL FOR NEXT