Sakshi Sunil Jadhav
सध्या हाय ब्लड प्रेशरच्या समस्या झपाट्याने वाढत चालल्या आहेत. याचं कारण म्हणजे बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयी हे आहे.
जर तुम्ही तुमच्या आहारातून सोडियम आणि अल्कोलचं प्रमाण कमी केलं, तर तुम्हाला ब्लड प्रेशरमध्ये बदल झालेला दिसतो. त्याचप्रमाणे काही फळं खाल्ली की तुम्हाला शरीरात चमत्कारी बदल झालेला जाणवेल.
कृष्णा फळामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं आणि यामध्ये पोटॅशियमही असतं.याचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर नैसर्गिक रित्या कमी होतं.
२०१७ मध्ये केलेल्या रिसर्चनुसार डाळिंबाचा ज्युस सुद्धा ब्लड प्रेशर नैसर्गितरित्या कमी करायला मदत करतो.
बीट हे आधीपासूनच बहुगुणी फळ आहे. त्यातील नायट्रेट्सच्या मदतीने तुम्ही ब्लड प्रेशर नियंत्रणात आणू शकता. कारण यातील नायट्रेट्स ऑक्साइडमध्ये रुपांतरीत होतात.
तुम्हाला फळं आणायला जमलं नाही तर तुम्ही टोमॅटोचा ज्यूस सेवन करू शकता. कारण हाय बीपीचा त्रास असलेल्या रुग्णांना याचा सर्वात जास्त फायदा होतो.
चेरीचा रस प्यायल्याने ब्लड प्रेशर कमी होण्याची शक्यता आहे. कारण एका स्टडीमध्ये ८ आठवडे दररोज ४३२ मिली चेरीचा रस प्यायल्याने सिस्टोलिक ब्लड प्रेशर कमी झाला.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.