Petrol Diesel Latest Price Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Prices Today: कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ; पेट्रोल-डिझेलचे दरही बदलले, जाणून घ्या आजची किंमत...

Petrol Diesel Latest Price: कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ; पेट्रोल-डिझेलचे दरही बदलले, जाणून घ्या आजची किंमत...

साम टिव्ही ब्युरो

Petrol Diesel Prices Today: जागतिक बाजारात प्रदीर्घ काळानंतर कच्च्या तेलाच्या दराने पुन्हा ८० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारी सकाळी जाहीर झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत बदल केले आहेत. मात्र आजही मुंबई आणि दिल्ली तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या २४ तासात त्याच्या किमती बदलल्या आहेत. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८०.२३ डॉलर्सपर्यंत वाढली आहे. जागतिक बाजारात डब्ल्यूटीआयचा दरही प्रति बॅरल ७५.८३ डॉलर्सवर पोहोचली आहे. (Latest Marathi News)

मुंबई-दिल्लीत किती आहे आजची किंमत?

मुंबईत आज पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये आहे. तर दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर आहे.

तसेच चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर - कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे.

यातच उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये पेट्रोल १४ पैशांनी स्वस्त होऊन ९६.४४ रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल १३ पैशांनी घसरून ८९.६२ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. बिहारची राजधानी पाटणामध्ये पेट्रोल १२ पैशांनी महागले असून १०७.५४ रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर डिझेल ११ पैशांनी वाढून 94.32 रुपये प्रति लिटरवर पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT