Credit Card Yandex
बिझनेस

Credit Card: क्रेडिट कार्डचं लिमिट वाढवायचं आहे? 'या' टिप्स फॉलो करा

Rohini Gudaghe

Credit Card Limit Increase Tips

क्रेडिट कार्ड (Credit Card) अनेकदा आपल्याला गरजेच्या वेळी मदत करतं. परंतु, अनेकदा आपल्या क्रेडिट कार्डची मर्यादा खूप कमी असते. तेव्हा क्रेडिट कार्डचं लिमिट कसं वाढवायचं, हा प्रश्न असतो. क्रेडिट कार्डचं लिमिट वाढविण्यासाठी काही टिप्स आहेत. त्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ या.  (Latest Marathi News)

क्रेडिट कार्डची मर्यादा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. आपण कार्ड कुठे, केव्हा आणि कसे वापरत आहोत, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. क्रेडिट कार्ड देखील वापरकर्त्यांनुसार मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. बँक आपल्या पेमेंटच्या आधारावर क्रेडिट कार्ड मर्यादा ठरवत (Credit Card Limit) असते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

  • नवीन कार्ड घ्या

    तुमच्या कार्डची मर्यादा वाढवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे नवीन क्रेडिट कार्डसाठी उच्च क्रेडिट मर्यादेसाठी अर्ज करणे. जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा क्रेडिट कार्ड काढता, तेव्हा तुमचे क्रेडिट एकाहून अधिक कार्डांमध्ये (Credit Card Limit) पसरते.

  • बँकेला विनंती करा

    क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्यासाठी, तुम्ही थेट बँकेला विनंती अर्ज देखील सबमिट करू शकता. तुमच्या विनंतीनंतर बँक क्रेडिट कार्डची सध्याची क्रेडिट मर्यादा वाढवू शकते. क्रेडिट मर्यादा वाढवण्यापूर्वी बँक तुमचा क्रेडिट इतिहास, क्रेडिट स्कोअर आणि उत्पन्न तपासू शकते.

  • योग्य परतफेड

    बऱ्याच बँका वार्षिक खर्च आणि ग्राहकांच्या परतफेडीच्या व्यहारांनंतर वार्षिक आधारावर क्रेडिट मर्यादा वाढवण्याची ऑफर (Credit Card Tips) देतात.

  • चांगला क्रेडिट स्कोअर

    क्रेडिट स्कोअरचा आपल्या क्रेडिट कार्ड क्रेडिट मर्यादेवर सर्वात मोठा प्रभाव पाडतो. त्यामुळे आपला क्रेडिट स्कोअर सुधारणे आवश्यक आहे. क्रेडिट स्कोअरला CIBIL स्कोर देखील म्हणतात. हा 3 अंकी क्रमांक आहे. तो एखाद्या व्यक्तीचे आर्थिक क्रेडिट दर्शवितो.

  • वेळेवर परतफेड करा

    तुमची क्रेडिट मर्यादा वाढवण्याची विनंती करण्यासाठी, तुम्ही आधी तुमच्या विद्यमान कर्जाची वेळेवर परतफेड करणे आवश्यक (Credit Card Limit Increase) आहे. गेल्या महिन्यातील कोणतीही थकबाकी आपलं काम खराब करू शकते. देय तारखेपूर्वी नेहमी सर्व बिले पूर्ण भरा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT