क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या शुल्कात बदल Saam Tv
बिझनेस

Credit Debit Cards Charges: ग्राहकांना मोठा झटका; 'या' २ बॅंकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या शुल्कात वाढ

Credit Debit Cards Charges Change: मे महिना सुरू झाला आहे. आजपासुन क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या शुल्कात बदल झाले आहे.

Rohini Gudaghe

नेहमीप्रमाणेच महिन्याचा पहिल्याच दिवशी अनेक बदल झाले आहेत. मे महिना सुरू झाला आहे. आजपासुन क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या शुल्कात बदल झाले आहे. ICICI बँकेने आजपासून ग्राहकांच्या बचत खात्यावरील शुल्कात बदल केलाय. याअंतर्गत डेबिट कार्डवरील (Debit Cards Charges) वार्षिक शुल्क दोनशे रुपये करण्यात आलं आहे. तर ग्रामीण भागात ते शुल्क 99 रुपये निश्चित केलं आहे.

याशिवाय बँकेने चेकबुकबाबतच्या नियमातही बदल केला (Saving Account Charges) आहे. याअंतर्गत 1 मे नंतर 25 पानांचे चेकबुक देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यानंतर प्रत्येक पानासाठी 4 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. IMPS व्यवहारांवर देखील अडीच ते पंधरा रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

याशिवाय बँक डिमांड ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर रद्द करणे, डुप्लिकेट किंवा पुनर्प्रमाणित करण्यासाठी शंभर रुपये शुल्क आकारणार (Bank Rule Changes) आहे. साइन पडताळणीसाठी अर्ज किंवा पत्र १०० रुपये आणि बँकेच्या शाखेतून विशिष्ट चेकचे पेमेंट थांबवण्यासाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. काही बॅंकांनी क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या शुल्कात वाढ केली आहे.

येस बँकेने (Yes Bank) आजपासून बचत खात्यांवरील किमान सरासरी शिल्लक शुल्काची रक्कम बदलली (Credit and Debit Cards Charges Change) आहे. येस बँकेने बचत खात्यांमधील किमान सरासरी शिल्लक बदलली आहे. आता येस बँकेच्या प्रो मॅक्स बचत खात्यांसाठी किमान सरासरी शिल्लक पन्नास हजार रुपये आणि कमाल शुल्क एक हजार रुपये करण्यात आले आहे.

युटिलिटी बिल पेमेंटसाठी येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट (Credit Card) कार्ड वापरणाऱ्या वापरकर्त्यांना आता अतिरिक्त शुल्क भरावं लागणार आहे. आजपासून येस बँकने क्रेडिट कार्डवर पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त वीज किंवा इतर युटिलिटी बिल पेमेंटवर १ टक्का अतिरिक्त शुल्क लागू केले गेले आहे. तर IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्डवर वीस हजारपेक्षा जास्त बिल पेमेंटवर एक टक्का अतिरिक्त शुल्क लागू करण्यात आले आहे. तर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चाकण औद्योगिक क्षेत्रातील वराळे येथे बिबट्याचे वास्तव्य, कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Nagar Parishad Live : राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात

शाहाच काढणार शिंदेंचा कोथळा, 'शिंदेंचे 35 आमदार फुटणार, राऊतांचा खळबळजनक दावा

Success Story : जिद्द! नोकरी सोडली अन् यूपीएससी दिली, IPS साठी सिलेक्शन पण IRS ची केली निवड; नेहा नौटियाल यांचा प्रवास

Guru Vakri: 5 डिसेंबरपासून या राशींच्या नशीबात येणार पैसाच पैसाच; गुरुची वक्री चाल करणार मालामाल

SCROLL FOR NEXT