संगणक उत्पादक कंपनी डेलने (DELL) कर्मचारी कपात केली आहे. गेल्या पंधरा दिवसात दुसऱ्यांदा कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. कंपनीने आएयचा वापर करुन काम करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे अनेक विभागांमधून कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे.
ब्लूमबर्ग वेबसाइटच्या म्हणण्यांनुसार, डेलच्या अधिकाऱ्यांनी मेमोमध्ये कर्मचारी कपातीची घोषणा केली. अजूनपर्यंत किती कामगारांना कामावरुन काढून टाकले आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, एका मीडिया रिपोर्टनुसार, जवळपास १२,५०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. त्यामुळे या आठवड्यात १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात झाली आहे.
एआयच्या वाढत्या वापरामुळे कर्मचाऱ्यांची गरज नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहेत.मीडिया रिपोर्टनुसार, या कर्मचारी कपातीत प्रामुख्याने व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापकांवर परिणाम झाला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले त्यातील काहींना २० वर्षांहून अधिकचा अनुभव होता.
मिंटच्या रिपोर्टनुसार, कंपनीतून ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले त्यातील काहीजण व्यवस्थापक, संचालक होते. त्यामुळे कंपनीच्या मार्केटिंग आणि ऑपरेशन्स डिपार्टमेंटला फटका बसत आहे. याबाबत कंपनीच्या एका कर्मचाऱ्यांनी सांगितले की, दर सहा महिन्यांनी कंपनीत कर्मचाऱ्यांची कपात केली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.