CNG PNG Rate Hike Today News  AI Image
बिझनेस

CNG Price Today : CNG च्या दरात मोठी वाढ, मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ; आजचे ताजे दर काय? वाचा

CNG Price Hike Today Update News : मुंबईकरांना मोठा आर्थिक झटका! MGLने CNGच्या दरात २ रुपये प्रति किलो आणि PNGच्या दरात १ रुपयाची वाढ केली. नव्या दरांनुसार मुंबईत CNG ८८ रुपये किलो झाले आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईत CNGच्या दरात २ रुपये प्रति किलो वाढ

  • वाढीनंतर CNGचा दर ८८ रुपये प्रति किलो

  • घरगुती PNGच्या दरात १ रुपयाची वाढ

  • CNG महागल्याने मुंबईतील रिक्षा, टॅक्सी आणि CNG वाहनचालकांचा खर्च वाढणार

सर्वसामान्य नागरिकांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच घरगुती सिलिंडरसोबत CNG च्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे आधीच त्रस्त असलेल्या मुंबईकरांच्या खर्चात आता आणखी वाढ होणार आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सीएनजीच्या दरात तब्बल २ रुपये प्रति किलो, तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ ३१ ऑगस्ट २०२६ च्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. यामुळे आता नागरिकांच्या खिशावर ताण आला आहे.

CNG चे आजचे ताजे दर

महानगर गॅस लिमिटेडने CNG च्या दरात २ रुपये प्रति किलो वाढ केल्याने CNG चे दर आता ८८ रुपये इतका झाला आहे. त्यामुळे सीएनजीवर धावणाऱ्या वाहनचालकांच्या नेहमीच्या खर्चात वाढ होणार आहे. विशेषतः मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसह सीएनजी वाहनांचा वापर करणाऱ्या नागरिकांना या दरवाढीचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आज पासून टॅक्सी आणि रिक्षाच्या भाड्यात देखील वाढ झालेली पाहायला मिळाते आहे.

घरगुती सिलिंडरच्या दरातही वाढ

त्याचबरोबर घरगुती पीएनजीच्या दरातही १ रुपयाची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर आता स्वयंपाकासाठी पीएनजीचा वापर करणाऱ्या घरांच्या महिन्याच्या खर्चातही काही प्रमाणात वाढ होणार आहे. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी ही दरवाढ आणखी एक आर्थिक भार ठरणार आहे.

का वाढले दर?

महानगर गॅस लिमिटेडने आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थिती आणि त्याचा नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर होणारा परिणाम यामुळे दरवाढीचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीला महागड्या स्पॉट आरएलएनजी (Spot RLNG) कडून गॅस खरेदी करावा लागत आहे. या वाढलेल्या खरेदी खर्चाचा परिणाम दरांवर झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. सीएनजीच्या दरात झालेल्या या नव्या वाढीमुळे मुंबईतील वाहनचालकांच्या खर्चाचे गणित पुन्हा एकदा बिघडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवात गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध; 'धार्मिक कार्यक्रमात गौतमीचा धांगडधिंगा कशाला?'

महाराष्ट्र हादरला! उपचाराच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीचा विनयभंग; ठाकरेंच्या शिवसैनिकांनी डॉक्टरला बदडला, आरोपी गजाआड

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वसामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला, तुमच्या शहरात आज काय भाव?

Tuesday Horoscope: पैसा, करिअर आणि कुटुंब... या ५ राशींचं नशीब चमकणार! वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT