CNG Price Hike Saam Tv
बिझनेस

CNG Price Hike: दिवाळीपूर्वीच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसणार; सीएनजीच्या दरात वाढ होणार?

Siddhi Hande

काही दिवसांतच दिवाळी सुरु होणार आहे. दिवाळीच्या काळात सर्वचजण खूप प्रमाणात शॉपिंग करतात. त्यामुळे खर्च वाढतो. परंतु आता या खर्चात आणखी वाढ होणार आहे. देशभरात सीएनजी गॅस महाग होणार असल्याचे सांगितले जात आहे. सीएनजी ४ ते ६ रुपयांनी महाग होणार आहे. नैसर्गिक वायू पुरवठ्यात कपात केली जात आहे. त्यामुळे सीएनजीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

देशभरातली किरकोळ विक्रेत्यांना नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो.या सर्व विक्रेत्यांच्या वायू पुरवठ्यात २० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे नैसर्गिक वायू पुरवठ्यावर ताण पडल्याने भविष्यात सीएनजीच्या दरात वाढ करावी लागणार आहे. (CNG Price)

सध्या घराघरात पुरवला जाणाऱ्या पीएनजी गॅसच्या किंमती स्थिर आहेत. देशात नैसर्गिक वायूचे दर सरकारकडून निश्चिक केले जातात. किरकोळ विक्रेत्यांना वायू पुरवठादेखील सरकारकडूनच केला जातो. यावर्षी नैसर्गिक वायूचे उत्पादन ५ टक्क्यांनी घटले आहे. या कच्च्या मालातूनच सीएनजीची निर्मिती केली जाते. त्यामुळेदेखील सीएनजीच्या किंमती वाढू शकतात.

१६ ऑक्टोबर २०२४ रोजी सरकारने विक्रेत्यांना पुरवठा केला जाणाऱ्या नैसर्गिक वायूत कपात केली होती. त्यामुळे फक्त ५०.७५ टक्के विक्रेत्यांची मागणी पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे सरकारने आता विक्रेत्यांच्या गॅस पुरवठ्यात घट केली आहे. ही घट अशीच राहिली तर सीएनजीच्या किंमती वाढू शकतात. (CNG Price Hike Due To Less Supply)

सध्या नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यातील ही घट भरुन काढण्यासाठी विक्रेत्यांना महागड्या द्रवरुप वायूची म्हणजे एलएनजीची खरेदी करावी लागणार आहे. सध्या तरी किरकोळ सीएनजी दरात कोणतीही वाढ झालेली नाही. परंतु हे दर भविष्यात वाढू शकतात. (CNG Price Hike)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जागा वाटपावरून मविआमध्ये वाद, ठाकरेंकडून प्लॅन A आणि प्लॅन B तयार

Peacock Age: मोर किती वर्ष जगतात?

Maharashtra News Live Updates: डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची ७ राखीव जागेवर दावेदारी

Bhandara News : माजी आमदारांच्या पक्ष प्रवेशानंतर मविआत बिघाडी; नाराज पदाधिकारी मेळाव्यात ठरविणार भूमिका

Maharashtra Politics: जालन्यात गोरंट्याल विरुद्ध खोतकर रंगणार संघर्ष?

SCROLL FOR NEXT